Forest Rights Act

मृत वनहक्क पट्टेधारकांच्या वारसांची नावे नोंदविण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी

 कुरखेडा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले असले तरी अनेक पट्टेधारकांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नावे अद्यापही संबंधित वनहक्क पट्ट्यांवर नोंदविण्यात आलेली नाहीत.

मृत वनहक्क पट्टेधारकांच्या वारसांची नावे नोंदविण्यासाठी विशेष शिबिर घेण्याची मागणी

Forest Rights Act

कुरखेडा : कुरखेडा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना वनहक्क पट्टे मिळाले असले तरी अनेक पट्टेधारकांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांची नावे अद्यापही संबंधित वनहक्क पट्ट्यांवर नोंदविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे वारसांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन व तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मृत वनहक्क पट्टेधारकांच्या वारसांची नावे वनहक्क पट्ट्यांवर नोंदविण्यासाठी कुरखेडा येथे विशेष शिबिर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी युवती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी युवती सेना जिल्हाप्रमुख प्रा. उमा चंदेल यांच्या नेतृत्वाखाली माधुरी चौधरी, लताबाई सहारे, रमशीला गुवाल, रजनी शाह, उषा जांभळे, मेना कपुरेडिया, गौरी कपुरे, इंदिरा कपुरेडिया, बेरा नेताम, नंदेश्वरी सहाळा, तिजिया दूधमोगरा, मोहन सहाळा, कुंभकर्ण डोंगरी, रामप्रसाद सिंगारे, भजन तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवती सेनेने प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन विशेष शिबिराचे आयोजन करावे, जेणेकरून वारसांची नावे वेळेत नोंदवून लाभार्थ्यांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026
FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

FDAच्या कारवाईने ‘सूरज लामा मोमोज’ चर्चेत; कधीकाळी सेलिब्रिटींचे ड्रायव्हर होते मालक

तुकाराम मुंढेंच्या FDAकडून कारवाई; ‘सूरज लामा मोमोज’सह ८ दुकानांचे परवाने निलंबित. कधीकाळी सेलिब्रिटी ड्रायव्हर असलेल्या सूरज लामांचा संघर्ष पुन्हा चर्चेत.

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026