दुचाकीत २०० रु तर कारमध्ये २ हजाराचे पेट्रोल मिळणार

 दुचाकीत २०० रु तर कारमध्ये २ हजाराचे पेट्रोल मिळणार

Fuel Supply

परभणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आवाहन

परभणी (Fuel Supply) : गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर इंधन टंचाईबाबत पसरणार्‍या अफवांमुळे परभणी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात गर्दी करण्यात येत आहे. परभणी शहरातील बहूतांश पेट्रोल पंपावर गुरुवार २६ मार्च रोजी नो स्टॉकचे बोर्ड लावण्यात आले होते. काही पंपावर मात्र प्रचंड गर्दी होती. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी गर्दी करण्याचे कारण नाही. वाढती गर्दी आणि पुरवठा साखळीतील अनियमितता टाळण्यासाठी दुचाकीमध्ये जास्तीत जास्त २०० रुपये तर चारचाकी वाहनात २ हजार रुपयांपर्यत पेट्रोल देण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, विलास मुसळे यांनी सांगितले आहे.

परभणी जिल्ह्यात इंधन तुटवटा निर्माण होऊ नये व अनावश्यक साठा नागरीकांकडून करण्यात येऊ नये यासाठी आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. पेट्रोलपंप चालकांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. दुचाकी वाहनांना एका वेळी जास्तीत जास्त २०० रुपये, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त २,००० रुपयापर्यंत इंधन दिले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई केली आहे. नागरीकांनी अनावश्यक गर्दी व वाहनाच्या रांगा टाळून आवश्यकते नुसारच इंधन घ्यावे. सर्व पेट्रोल पंप चालकांना या नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज सकाळी त्यांच्याकडे असलेला शिल्लक साठा दर्शनी भागात बोर्डवर लावण्याबाबत आदेश देण्यात आले असून एखादा पेट्रोल पंप चालकाने नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कारवाई करून परवाना रद्द करण्यासह कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनातर्पेâ जिल्हा पुरवठा अधिकारी,  विलास मुसळे यांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

फ्लाय-दुबई पायलट स्मित माछर यांनी PM मोदींशी संवादात विमानातील संकटाचा अनुभव सांगितला. हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Oct 02, 2026
CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? CEC विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आहे.

Sep 29, 2026
डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

डिझेल खरेदीवर मोठी मर्यादा! Jio-BP पंपांवर 50 लिटरची कमाल सीमा; Nayara Energyचाही पुरवठा नियंत्रित

Jio-BPच्या काही पंपांवर डिझेल खरेदी 50 लिटरपुरती मर्यादित; Nayara Energyवरही निर्बंध. सरकारी तेल कंपन्यांच्या पंपांवर मात्र सध्या विक्री सुरळीत.

Sep 24, 2026
LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric: ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले: पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालय

Sep 21, 2026