रस्ते विकास महामंडळ करणार खनिज वाहतुकीसाठी मार्गाचे बांधकाम

रस्ते विकास महामंडळ करणार खनिज वाहतुकीसाठी मार्गाचे बांधकाम

Gadchiroli Mining Road

सुधारीत आखणीस व भूसंपादनाकरीता प्रशासकीय मान्यता

गडचिरोली (Gadchiroli Mining Road) : गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे.-कोनसरी-मूलचेरा-हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंत रस्त्याचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास , सुधारीत आखणीस व भूसंपादनाकरिता शासनाकडून प्रशासकीय मान्यता  प्राप्त झाली आहे. यामुळे या मार्गाच्या बांधकामाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मे. लॉयड्स मेटल्स व एनर्जी लि. या कोनसरी येथील एक 'एकात्मिक पोलाद  प्रकल्पामुळे' सुमारे १५,००० रोजगार निर्मिती होणार आहे व यामुळे या परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास देखील होईल.  कोनसरी येथील प्रकल्पाचे विस्तारीकरण आगामी एक-दोन वर्षांमध्ये टप्पा-टप्याने पूर्ण होत असून या विस्तारित प्रकाल्पाकरिता सुरजागड येथील खाणीमधून साधनसामग्रीची वाहतुक मोठ्या प्रमाणात राहील. राज्याच्या विकसित भागांशी खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीतरिया किफायतशीर किंमतीत होण्याच्या दृष्टीने हा भाग हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग व प्रस्तावित नागपूर- चंद्रपूर (सेलडोह-नवेगाव मोरे.) प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने राज्यातील अन्य भागाशी जोडण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाकडून प्रस्तावित दुर्ग-हैद्राबाद प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास जोडल्यामुळे देशाच्या अन्य भागांशी जोडण्याकरीता विशेष खनिज वाहतुकमार्गाची आवश्यकता असल्यामुळे नवेगाव मोरे.-कोनसरी-मूलचेरा-हेडरी ते सुरजागड खाणीपर्यतच्या रस्त्याचे काम हाती  घेण्यात येणार आहे.

०७ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे.-कोनसरी-मूलचेरा-हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंत ८४.६३८ कि.मी. लांबीच्या आखणीस मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर प्रस्तावित उद्योग व नागरी प्रकल्पाच्यादृष्टीने  जिल्हाधिकारी यांच्या सहमतीने प्रस्तावित रस्त्याच्या आखणीत सुधारणा करण्यात आली आहे.

या अंतर्गत गाडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे-कोनसरी-मूळचेरा-हेदरी ते सुरजागड या रस्त्याच्या एकुण ८५.७६५ कि.मी. लांबीच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात  आली  आहे. गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे-कोनसरी-मूलचेरा-हेडरी ते सुरजागड महामार्ग  हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

भूसंपादनासाठी २७४.२२ कोटी रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मंजुरी

सदर प्रकल्पांची भूसंपादनाची कार्यवाही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत तात्काळ हाती घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रकल्पाकरीता भूसंपादन रक्कम१५८.२८ कोटी व संभाव्य व्याज ११५.९४ कोटी असे एकूण २७४.२२ कोटी इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात  आली  आहे. सदर प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्ज  उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी परदेश प्रवास आणि विदेशातील लग्नसोहळे टाळण्याचं आवाहन; मोदींचा आत्मनिर्भर भारतावर भर

आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी परदेश प्रवास आणि विदेशातील लग्नसोहळे टाळण्याचं आवाहन; मोदींचा आत्मनिर्भर भारतावर भर

भारतीय अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत ७.८ टक्क्यांचा विकासदर नोंदवत दमदार कामगिरी केली आहे.

Sep 01, 2026
विजय सरकारचा 'सुपर बजेट'!; शिक्षण, आरोग्य आणि विकासावर मोठा भर

विजय सरकारचा 'सुपर बजेट'!; शिक्षण, आरोग्य आणि विकासावर मोठा भर

Tamil Nadu Budget 2026: या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, सामाजिक कल्याण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासासाठी मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली. तसेच 2036 पर्यंत तमिळनाडूला 1.5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था

Aug 05, 2026
परभणीतील जांभूळ बेटाच्या पर्यटन विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा

परभणीतील जांभूळ बेटाच्या पर्यटन विकासासाठी केंद्राकडे पाठपुरावा

Jambhul Bet Tourism Development: विधानसभा मतदार संघाला लाभलेले निसर्गाचे अनमोल वरदान असलेल्या जांभूळ बेट या पर्यटनस्थळाला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी आ. डॉ.रत्नाकर गुट्टे

Jul 28, 2026
गडचिरोलीत रस्त्याअभावी खाटच रुग्णवाहिका! १४४ गावांतील रुग्ण व गर्भवतींची पावसाळ्यात जीवघेणी कसरत

गडचिरोलीत रस्त्याअभावी खाटच रुग्णवाहिका! १४४ गावांतील रुग्ण व गर्भवतींची पावसाळ्यात जीवघेणी कसरत

राज्यात विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव कायम आहे.

Jul 22, 2026
‘भगवान भरोसे काम चालणार नाही’; फडणवीसांचा अधिकारी-कंत्राटदारांना कठोर चेतावणी

‘भगवान भरोसे काम चालणार नाही’; फडणवीसांचा अधिकारी-कंत्राटदारांना कठोर चेतावणी

राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये होणारा विलंब कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

Jun 06, 2026