गादेगाव पाणीटंचाई संकट

गादेगाव तांड्यावर पाणी टंचाई; १ मे रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा!

Gadegaon water shortage crisis: गादेगाव तांड्यावरील पाणीटंचाईमुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत. १ मे २०२६ रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला गेला आहे.

गादेगाव तांड्यावर पाणी टंचाई; १ मे रोजी गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा!

Gadegaon water shortage crisis

मानोरा (Gadegaon water shortage crisis) : तालुक्यातील शेवटच्या टोकावरील गादेगाव तांड्यावर पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास १ मे २०२६ रोजी पंचायत समिती मानोरा येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सुदाम भिका जाधव यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मानोरा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गादेगाव हे १४०० लोकवस्तीचे गाव असून येथे ग्रामीण पाणीपुरवठा, जल जीवन मिशन आणि माजी आमदार गजानन यांच्या २८ गावातील जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. तरीही गादेगाव तांड्यावर गटातटातील राजकारणामुळे लग्नसराईत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
 
२२  एप्रिल २०२५ पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी माजी सरपंच भारत आडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर आंदोलन ?(Gadegaon water shortage crisis) केले होते. तरीही पाणी पुरवठा सुरळीत न होता पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. यामुळे ३० एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा न झाल्यास १ मे रोजी काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.  

गावात तीन योजना आणि पाण्याची टाकी असतानाही सणासुदीला व उन्हाळ्यात लग्नसराई पाणीपुरवठा (Gadegaon water shortage crisis) होत नसल्याने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तांड्यातील महिलांना पाण्यासाठी डोंगर-दरी पालथी घालावी लागत असून, वाढत्या उन्हात ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. पाण्यासाठी राजकारण करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी या गंभीर समस्येतून तातडीने दिलासा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून, जिल्हाधिकारी वाशिम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम, तहसीलदार मानोरा आणि ठाणेदार मानोरा यांनाही याची प्रतिलिपी पाठवण्यात आली आहे. 

संबंधित सामग्री

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमारांचा दौरा स्थगित; आता राजीनामा देणार?

ज्ञानेश कुमार यांचा छत्तीसगड दौरा स्थगित झाला असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

Oct 06, 2026
विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

विविध विभागांच्या प्रलंबित प्रकरणाचा सीईओ विवेक गायकवाड यांच्याकडून आढावा

Hingoli Water Scarcity Plan: जिल्हा परिषदेच्या सभागृहात ५ ऑक्टोबर सोमवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी २ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले

Oct 05, 2026