Gambling Raid

हिप्पळगावात तिर्रट जुगारावर धाड; दहा जणांना घेतले ताब्यात!

पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड टाकून दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

हिप्पळगावात तिर्रट जुगारावर धाड; दहा जणांना घेतले ताब्यात!

लातूर : परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्या पथकाने हिप्पळगाव ते सुगाव रस्त्याच्या पश्चिम बाजूस, हिप्पळगाव शेतशिवारातील संतोष तुकाराम पेदाटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड टाकून दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत पाच लाख तीन हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अक्षय जाधव हे सध्या शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आहेत. १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४० वाजता त्यांनी संतोष तुकाराम पेदाटे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या तिर्रट जुगारावर कारवाई केली.

या कारवाईत पुढील दहा जणांना ताब्यात घेण्यात आले :

  1. कृष्णा पांडुरंग मुडे, वय ३५ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.
  2. मुक्तार महमद शेख, वय ४३ वर्षे, रा. हिप्पळगाव, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर.
  3. सोपान केरबा तावरे, वय ३० वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.
  4. संतोष तुकाराम पेदाटे, वय ४२ वर्षे, रा. हिप्पळगाव, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर.
  5. गणेश पंढरी गुणाले, वय ३८ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.
  6. शरद गोविंद धोतरे, वय ४३ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.
  7. अनिल अशोक धोतरे, वय ४४ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.
  8. प्रल्हाद बाबुराव शिंदे, वय ३८ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.
  9. रमजान काशीम पठाण, वय ३५ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.
  10. विजयकुमार विठ्ठल बरकते, वय ४७ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर.

घटनास्थळावरून मोबाईल, मोटारसायकली यासह एकूण ५,०३,१०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १९५/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

अवैध धंद्यांवर कळमनुरी पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैधधंदे चालकांचे धाबे दणाणले

Kalamnuri Police Action: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी पोलिसांकडून जुगार अड्डे

Oct 04, 2026
चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

चोरीस गेलेल्या पिकअपचा हिंगोली ग्रामीण पोलिसांनी लावला शोध;अवघ्या काही तासात आरोपी जेरबंद

Hingoli Rural Police Action: शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा पिकअप चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस

Oct 02, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026
नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

Latur Matka-Gambling Raid: लातूरचे पोलीस हेल्मेट सक्तीच्या कामगिरीत गुंतले असताना दुसरीकडे नांदेडच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर शहर जिल्ह्यात राजरोस चालणाऱ्या मटका व जुगारांवर धाड..

Oct 01, 2026