गणेश मंडळ परवानगी

हिंगोली जिल्ह्यात गणेश मंडळांची धर्मदाय परवानगीकडे पाठ

Ganesh Mandal Permission:

हिंगोली जिल्ह्यात गणेश मंडळांची धर्मदाय परवानगीकडे पाठ

Ganesh Mandal Permission

 

दरवर्षी परवानगी घेणार्‍या मंडळाची संख्या घटतेय

हिंगोली (Ganesh Mandal Permission) : सार्वजनिक गणेश मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे बंधनकारक असताना जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतकीच मंडळे परवानगी घेत असल्याचे चित्र आहे. बहुतांश मंडळे केवळ पोलीस ठाण्याचा परवाना घेऊन मंडळाची स्थापना करत आहेत. प्रत्यक्षात धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी असल्याशिवाय पोलीस ठाण्याचा परवाना देता येत नाही, असे धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात येते.हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून धर्मदाय परवाना घेणार्‍या मंडळांची संख्या सातत्याने घटत आहे.

सन २०२३-२४ मध्ये जिल्हाभरातून केवळ १२ मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतली होती. सन २०२४-२५ मध्ये ही संख्या २० वर गेली होती. तसेच नवरात्रात दुर्गा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मोठ्या संख्येने जिल्ह्यात दुर्गादेवीची स्थापना केली जाते मात्र धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणारी मंडळे कमी आहेत सन २०२३-२४ मध्ये केवळ १२ मंडळाने परवानगी घेतली होती. २०२४-२५ मध्ये ११ दुर्गा मंडळाने परवानगी घेतली होती. दरम्यान, यंदा गणेशोत्सव तोंडावर आला असतानाही अद्याप एकाही सार्वजनिक गणेश मंडळाने धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे परवानगीसाठी अर्ज केलेला नाही, अशी माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी (Ganesh Mandal Permission) केल्यानंतरच मंडळाला कायदेशीर अस्तित्व मिळते. वर्गणी, देणगी, खर्चाचा हिशोब आणि मंडळाच्या पारदर्शकते साठी ही नोंदणी आवश्यक आहे. परवानगी न घेता वर्गणी गोळा करणे नियमबाह्य ठरते.जिल्ह्यात शेकडो सार्वजनिक गणेश मंडळे स्थापन होत असताना केवळ १२ ते २० मंडळांनीच अधिकृत परवानगी घेणे, हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे आणि मंडळांच्या अनास्थेचे द्योतक मानले जात आहे. धर्मदाय आयुक्त कार्यालयाने आता परवानगीबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याची चर्चा होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत गणेशोत्सव २०२६ साठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन

हिंगोलीत गणेशोत्सव २०२६ साठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन; गणेश मंडळांना पोलिसांचे आवाहन

गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना आवश्यक असलेल्या परवानग्यांसाठी आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Sep 05, 2026