परभणी बँक फसवणूक

परभणीत बँकेचे कर्ज काढून देतो म्हणून केली शिक्षकाची फसवणूक

Parbhani Bank Fraud: गंगाखेड येथील शिक्षक बालू पेमा राठोड आणि वाघदरावर एकविरुद्ध फसवणूकाच्या संदर्भात राजकुमार गायकवाडने कर्जाचा धोका घेतला. त्या दोघांच्या विरुद्ध १३ जूनला फसवणूकची गुन्हा

परभणीत बँकेचे कर्ज काढून देतो म्हणून केली शिक्षकाची फसवणूक

Parbhani Bank Fraud

 

दोन लाख तीन हजार रुपयाला गंडवले; एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

गंगाखेड (Parbhani Bank Fraud) : बँकेचे कर्ज काढून देतो म्हणून दोन लाख तीन हजार रुपये व कागदपत्र घेऊन शिक्षकाची फसवणूक करणार्‍या एका इसमाविरुद्ध शनिवार १३ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील व्यंकटेश नगर येथील रहिवासी तथा शंकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बालू पेमा राठोड यांच्या नावे भारतीय स्टेट बँकेचे कर्ज काढून देतो म्हणून राजकुमार रमेश गायकवाड रा. ठाकुर कॉलनी गंगाखेड याने २२ मे रोजी आधार कार्ड, पॅन कार्ड, स्लॅरी स्लिप, तीन कोरे चेक, दोन नोटरीचे बॉण्ड, दोन कोरे बॉण्ड घेत तेंव्हापासून ते १० जून रोजीपर्यंत वेळोवेळी रोख व फोन पेच्या माध्यमातून दोन लाख तीन हजार रुपये घेतले व (Parbhani Bank Fraud) बँकेच्या कर्जाचे काम न करता फसवणूक केली.

तेंव्हा त्यास कर्जाच्या कामाबाबत विचारणा करून कागदपत्र व पैसे परत मागितले असता तुझ्याच्याने काय होतं ते कर असे म्हणत कागदपत्रे व पैसे परत केले नाही व तुझे चेक बाउन्स करून तुझ्यावरच मी गुन्हा दाखल करतो अशी धमकी दिल्याची फिर्याद शिक्षक बालू पेमा राठोड वय ५३ वर्ष रा. वाघदरा तांडा ता. गंगाखेड ह.मु. व्यंकटेश नगर गंगाखेड यांनी शनिवार १३ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून राजकुमार गायकवाड याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.