व्यसनमुक्ती जनजागृती रॅली

पोलीस मदत केंद्राच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती रॅली; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Addiction-Free Awareness Rally: घोट पोलीस मदत केंद्राने व्यसनमुक्त रॅलीच्या आयोजनेत जिल्ह्यातील शाळांपासून विद्यार्थ्यांचा उत्स्फूरत सहभाग दाखवला. येथे वयस्कांचा समावेश असलेल्या कार्यक्रम

पोलीस मदत केंद्राच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती रॅली; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Addiction-Free Awareness Rally

घोट (Addiction-Free Awareness Rally) : पोलीस मदत केंद्र घोटच्या वतीने व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत जिल्हा परिषद महात्मा गांधी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, प्रायमरी नवोदय हायस्कूल तसेच परमपूज्य महात्मा गांधी कन्व्हेंट विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

रॅलीची सुरुवात घोट येथून करण्यात आली असून गावातील प्रमुख मार्गांवरून घोषणाबाजी करत जनजागृती करण्यात आली. (Addiction-Free Awareness Rally) रॅलीनंतर बसस्थानक चौकात आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व नागरिकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी (Addiction-Free Awareness Rally) घोटच्या सरपंच रुपाली दुधबावरे,घोट पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे,व्यसनमुक्त समितीचे अध्यक्ष आसिफ सय्यद, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दिनकर लाकडे,पत्रकार हेमंत उपाध्ये,लिना विश्वास,तसेच शिक्षक टेंबरे,येसेकर, बोरकर,कासलावार, कोवाची,मोगरकर,नैताम, गजभिये,उसेंडी,बोदलकर, रामटेके यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आणि समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन केले.*

संबंधित सामग्री

आम्ही सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी: आ. संजय गायकवाड

आम्ही सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी: आ. संजय गायकवाड

MLA Sanjay Gaikwad: आम्ही सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहोत. सत्तेपेक्षा जनतेचा विश्वास आमच्यासाठी मोठा आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, विकासकामे करणे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी...

Aug 17, 2026
मलकापूर उपविभागात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी 'दामिनी पथक' सज्ज

मलकापूर उपविभागात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी 'दामिनी पथक' सज्ज

Malkapur Damini Squad: 'दामिनी पथक' मलकापूरमधून सुरू झाले आहे, जे महिलांना संरक्षण देण्यासाठी सज्ज असलेले पथक आहे. यात महिला पोलिस उपनायिका माधुरी साळुंके नेतृत्व

Jul 28, 2026
जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांची भक्तिमय वातावरणात दिंडी!  

जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांची भक्तिमय वातावरणात दिंडी!  

Ashadhi Ekadashi Dindi Festival: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तालुक्यातील मौजे आसोला खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने दि. २५ जुलै रोजी गावातून पारंपरिक वारकरी दिंडी

Jul 25, 2026
आमदार संतोष बांगर यांच्याकडून शेकडो युवकांसह विठ्ठलाचे दर्शन

आमदार संतोष बांगर यांच्याकडून शेकडो युवकांसह विठ्ठलाचे दर्शन

MLA Santosh Bangar: व्यापारी व जिमचे युवकही सहभागी ​हिंगोली कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोषराव बांगर यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन

Jul 20, 2026