घोट–रेगडी मार्ग

घोट–रेगडी मार्गावरील निकतवाडा येथे खड्ड्यात अडकला धान्याने भरलेला ट्रक

Ghot-Regdi Road: घोट–रेगडीमार्गावरील निकतवाडा गावाजवळ धान्याचा पोत ट्रक रस्त्यामध्ये खड्ड्यात फसला. जेसिबीच्या मदतीने खालून काढलेला ट्रक मोकळा झाला, मार्गात वाहतूक सुरू झाली.

घोट–रेगडी मार्गावरील निकतवाडा येथे खड्ड्यात अडकला धान्याने भरलेला ट्रक

Ghot-Regdi Road

 

जेसीबीच्या मदतीने अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर मार्ग मोकळा

घोट (Ghot-Regdi Road) : घोट–रेगडी मार्गावरील निकतवाडा गावाजवळ आज पहाटे धान्याच्या पोत्यांनी भरलेला एक मालवाहू ट्रक रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात फसल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ट्रक खड्ड्यात अडकल्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्या.

घोट–रेगडी मार्गाची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.आज पहाटे धान्याची वाहतूक करणारा ट्रक निकतवाडा गावाजवळील मोठ्या खड्ड्यात अडकला. खड्डा खोल असल्याने ट्रकचे चाक पूर्णपणे रुतले आणि वाहन पुढे-मागे हलविणेही शक्य झाले नाही. त्यानंतर जेसीबी (क्रेन) मागविण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्यासाठी अनेक तास प्रयत्न करण्यात आले. ट्रकवर मोठ्या प्रमाणात धान्याचा माल असल्याने वाहन बाहेर काढणे अधिक कठीण झाले. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनीही मदतीचा हातभार लावला. अखेर अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रक सुरक्षितपणे खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

या घटनेमुळे घोट–रेगडी मार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वीच रस्त्याची अशी अवस्था झाली असेल, तर मुसळधार पावसानंतर परिस्थिती किती गंभीर होईल, अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो लहान-मोठी वाहने तसेच धान्य, रेती व इतर मालवाहतूक करणारे ट्रक ये-जा करतात. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून सर्व खड्डे बुजवावेत,अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात, वाहतूक कोंडी आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

रस्ता कामाच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे तहसीलसमोर आमरण उपोषण

रस्ता कामाच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे तहसीलसमोर आमरण उपोषण

Fasting to death: रोहडा ते आंत्रीखेडेकर आणि तपोवन देवी ते आंत्रीखेडेकर रस्त्यांचे बांधकाम असलेले खराब अवस्थेत असल्यामुळे ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

Jun 01, 2026