इंडियन मेडिकल असोसिएशन

इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना नसलेल्या लॅब जवळा बाजारात सुरू

Indian Medical Association: रक्त तपासणी करणार्‍या आठ मेडिकल लॅब कार्यरत असून बहुतेक जणांकडे इंडियन मेडिकल असोसिएशनचा मान्यताप्राप्त परवाना नसताना रक्त तपासणीचा गोरख धंदा सुरू

इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना नसलेल्या लॅब जवळा बाजारात सुरू

Indian Medical Association

 

जिल्हा आरोग्य कार्यालयाचे दुर्लक्ष; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू
खाजगी रुग्णालयांची मिलीभगत

जवळा बाजार (Indian Medical Association) :  येथे रक्त तपासणी करणार्‍या आठ मेडिकल लॅब कार्यरत असून बहुतेक जणांकडे इंडियन मेडिकल असोसिएशनचा मान्यताप्राप्त परवाना नसताना रक्त तपासणीचा गोरख धंदा सुरू असून जिल्हा आरोग्य कार्यालय व अन्न व औषध प्रशासन या सर्व प्रकाराकडे डोळे झाकून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
   
रक्त तपासणी लॅब उघडताना आवश्यक शैक्षणिक पात्रते सोबतच इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना असणे गरजेचे असताना सदर परवाना न घेताच अनेक जणांनी मेडिकल लॅबचे 'दुकान ' थाटले असून यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येते. जवळाबाजार येथे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे जवळपास ७० डॉक्टर कार्यरत असून तपासणी करण्यासाठी आलेल्या बहुतेक रुग्णांचे रक्त तपासल्याशिवाय त्यांच्या जीवाला 'चैन' पडत नाही. काही रुग्णालयांच्या नातेवाईकांच्या लॅब असून इतर काही जणांची मेडिकल लॅब सोबत मिली भगत असते हे तर सर्वांनाच माहित आहे.

मात्र प्रत्येक लॅब वर रक्त तपासणीचे वेगवेगळे रिपोर्ट येतात हे अनेक रुग्ण बोलून दाखवत असले तरी (Indian Medical Association) उपचार मिळण्यामध्ये दिरंगाई होण्याच्या भीतीने ऑन रेकॉर्ड बोलण्याचे टाळतात. रक्त तपासणीचा चुकीचा रिपोर्ट आल्यास उपचाराची पद्धतही चुकीची अवलंबली जाण्याची शक्यता असते. अशा प्रकारामुळे काही हृदय रुग्णांना मागील काळात जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. जिल्हा आरोग्य कार्यालयाने याबाबत तातडीने पावले उचलून कडक  कार्यवाही करावी अशी अपेक्षा रुग्णांकडून होत आहे.

 डेंग्यू आजारासाठी रक्त निदान करताना ६०० रुपये फीस मेडिकल लॅब कडून आकारले जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८०० रुपये घेतले जातात. फिवर प्रोफाइल ची तपासणी करताना सहा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासणीचे अहवाल अपेक्षित असतात. मात्र प्रत्यक्षात एवढ्या तपासण्या केल्या जात नाहीत. सीबीसी रिपोर्ट साठी प्रत्यक्षात १०० रुपये तपासणी फीस असताना अनेक मेडिकल लॅब कडून २०० ते ३०० रुपये उकळण्यात येतात.

संबंधित सामग्री

आयएमएची २० जुलैला बंदची हाक; डोंबिवली हल्ल्याच्या निषेधार्थ लातूरमध्येही आरोग्य सेवा राहणार बंद 

आयएमएची २० जुलैला बंदची हाक; डोंबिवली हल्ल्याच्या निषेधार्थ लातूरमध्येही आरोग्य सेवा राहणार बंद 

Latur Health Services: इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रच्या हाकेला प्रतिसाद देत आयएमए लातूर शाखेतर्फे २० जुलै रोजी सकाळी ६ ते २१ जुलै रोजी सकाळी ६ या कालावधीत २४ तासांचे आंदोलन

Jul 17, 2026