आ. डॉ. राहूल पाटील

परभणीत उद्योजक शब्दाचा वापर करुन संगणक ऑपरेटरची दिशाभूल करु नका...!

MLA Dr. Rahul Patil: परभणीत विधानसभा अधिवेशनात, आ. डॉ. राहुल पाटील यांनी मंत्री जयकुमार गोरेला सांगितले की 'संगणक ऑपरेटर' नावाने त्यांना उद्योजक म्हणून दिशाभूल करत नका.

परभणीत उद्योजक शब्दाचा वापर करुन संगणक ऑपरेटरची दिशाभूल करु नका...!

MLA Dr. Rahul Patil

 

ऑपरेटरना किमान वेतन देण्याची मागणी आ. डॉ. राहूल पाटील यांनी मंत्र्यांना सुनावले...!

परभणी (MLA Dr. Rahul Patil) : विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी संगणक ऑपरेटरांना 'उद्योजक' संबोधत शासनाने २० हजार उद्योजक घडविल्याचा दावा करताच आ. डॉ.राहुल पाटील यांनी संताप व्यक्त केला. केवळ १० हजार रुपयांवर बारा तास काम करणार्‍या संगणक ऑपरेटरांना 'उद्योजक' म्हणून त्यांची दिशाभूल करु  नका, अशा शब्दात सुनावत आ.डॉ. पाटील यांनी ऑपरेटरना किमान १७ हजार रुपये वेतन देण्याची मागणी केली. 

विधानसभेच्या अधिवेशनात संगणक ऑपरेटरांच्या वेतनावर आ. डॉ. पाटील यांनी प्रश्न मांडला. यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी संगणक ऑपरेटर हे उद्योजक असल्याचा अजब दावा केला. यावर आ.डॉ. पाटील यांनी मंत्री गोरे यांना चांगलेच धारेवर धरत हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ग्रामपंचायतीत नागरिकांना जन्म, मृत्यू, उत्पन्न, रहिवासी अशी विविध प्रमाणपत्रे काढून देणे ही सेवा झाली, पण त्याला व्यापार कसा म्हणायचा ? आणि ही सेवा देणार्‍या तरुणांना उद्योजक कसं म्हणायचं?  केवळ कंत्राटी पद्धतीने काम करून घेऊन त्यांच्यावर 'उद्योजक' हा शिक्का मारणे म्हणजे त्यांच्या वास्तवापासून पळ काढण्याचा प्रयत्न आहे.

संगणक ऑपरेटरांना उद्योजक म्हणून त्यांची दिशाभूल करू नका.अशा शब्दात मंत्री गोरे यांना सुनावले. आ. पाटील पुढे म्हणाले,मोठ्या कंपन्यांचे प्रशिक्षण किंवा प्रमाणपत्र मिळाले म्हणून कोणी उद्योजक होत नाही! महिन्याला केवळ १० हजार रुपयांवर, दिवसाचे १२-१२ तास काम करणार्‍या तरुणांना उद्योजक म्हणणे म्हणजे त्यांच्या संघर्षाची थट्टा करण्यासारखे आहे. खरोखरच ते कामगार नाहीत, तर मग त्यांच्याकडून एवढे तास काम का करून घेतले जातात? आणि जर ते कामगार आहेत, तर त्यांना श्ग्हग्स्ल्स् ेंaुो Aम्ू अंतर्गत संरक्षण का दिले जात नाही ? अशा स्पष्ट शब्दांत जाब विचारला. संगणक ऑपरेटरांना किमान १७ हजार रुपये वेतन देण्याची ठाम मागणी केली. सरकारने दिखाऊ दावे सोडून संगणक ऑपरेटरांना न्याय द्यावा.अशी मागणी केली.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026
परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

परभणीत अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास दोन वर्ष सश्रम कारावास

Parbhani Rigorous Imprisonment: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे बोलणार्‍या आरोपीस जिल्हा न्यायाधीश -१, जिल्हा व सत्र न्यायाधीश गंगाखेड जि.पी.बावस्कार दोन वर्ष सश्रम कारावास..

Sep 29, 2026