ग्रामपंचायत निवडणूक 2026

पळसखेड दौलत ग्रामपंचायत निवडणूक 2026: प्रभागनिहाय सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर

Gram Panchayat Election 2026: ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर पळसखेड दौलत येथे प्रभागनिहाय सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभेत जाहीर करण्यात आली.

पळसखेड दौलत ग्रामपंचायत निवडणूक 2026: प्रभागनिहाय सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर

Gram Panchayat Election 2026

पळसखेड दौलत (Gram Panchayat Election 2026) : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर पळसखेड दौलत येथे प्रभागनिहाय सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभेत जाहीर करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 9 वाजता आयोजित ग्रामसभेत नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. तहसीलदार विजय सवडे यांच्या आदेशानुसार व निवडणूक नायब तहसीलदार कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. अध्यासी अधिकारी म्हणून संजय डुकरे यांनी कामकाज पाहिले.

ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय सदस्य पदांसाठी (Gram Panchayat Election 2026) आरक्षणाची सोडत काढण्यात आली. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महिला राखीव जागेची चिठ्ठी अंकुश रमेश बोर्डे यांच्या हस्ते काढण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया खुल्या व पारदर्शक वातावरणात पार पडली. त्यानंतर अध्यासी अधिकारी संजय डुकरे यांनी संबंधित प्रभागांचे आरक्षण जाहीर केले.

आरक्षण निश्चित झाल्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election 2026) इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग येणार असून ग्रामस्थांमध्येही निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे. लोकशाही मूल्ये जपत निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी संजय पऱ्हाड, कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आरक्षण सोडत हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून गावातील लोकशाही प्रक्रियेला यामुळे अधिक बळकटी मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.