ग्रामपंचायत अधिकारी युनियन

वसमत येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या माध्यमातून धरणे आंदोलन

Gram Panchayat Officers' Union: वसमत येथे  पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने विविध  मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले

वसमत येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या माध्यमातून धरणे आंदोलन

Gram Panchayat Officers' Union


वसमत (Gram Panchayat Officers' Union) : वसमत येथे  पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने विविध  मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी करण्यात आलेल्या एक दिवसीय लाक्षणिक आंदोलनामध्ये कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या माध्यमातून वसमत शाखेच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले शुक्रवारी वसमत पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Gram Panchayat Officers' Union) करून मागणीची निवेदन देण्यात आले. यामध्ये ग्राम ग्राम पंचायत अधिकारी कर्मचाऱ्यांचे झालेले निलंबन व रोखलेली वेतनवाढ तात्काळ रद्द करावी,  अतिरिक्त कार्यभार सांभाळणान्या अधिकान्यांना शासन निर्णयाप्रमाणे अतिरिक्त मानधन देण्यात यावे.'आदर्श ग्रामसेवक' पुरस्कारार्थीची निवड आणि वितरण करण्यात यावे. या व विविध मागण्या करण्यात आल्याया आंदोलनामध्ये वसमत शाखेचे ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.