ग्रामपंचायत सरपंच आरक्षण

औंढा ना.ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणात ‘कही खुशी कही गम’

Gram Panchayat Sarpanch Reservation: तालुक्यातील २७ ग्राम पंचायतींच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाची सोडत बुधवारी  ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय औंढा नागनाथ

औंढा ना.ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणात ‘कही खुशी कही गम’

Gram Panchayat Sarpanch Reservation

 

१० महिला ओबीसी,१०  नागरिकांचा मागास प्रवर्ग तर ओबीसी मधल्या ७ जागा सर्वसाधारण

औंढा नागनाथ (Gram Panchayat Sarpanch Reservation) : तालुक्यातील २७ ग्राम पंचायतींच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाची सोडत बुधवारी  ९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय औंढा नागनाथ येथे उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार आणि गाढे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकाच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण सोडण्यात आले .हे आरक्षण चिट्ठी द्वारे काढण्यात आले .यावेळी अनुश्री या चार वर्षाच्या मुलीच्या हाताने चिठ्ठ्या प्लास्टिक डब्यातून काढण्यात आल्या.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी यापूर्वी निश्चित झालेले आरक्षण मात्र कायम आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग सोडत ग्रामपंचायती आमदरी, नागेशवाडी, सोनवाडी, राजदरी, दरेगाव, ब्राह्मणवाडा, नागझरी, वसई, आजरसोंडा , बेरुळा, उंडेगाव, दोडगांव , बोरजा, नांदखेडा, काठोडा तांडा, लक्ष्मण नाईक तांडा , गांगलवाडी, जलालदाभा, काठोडा, काकडदाबा, पूर, सुकापुर, वडद, आसोदा, निशाणा , तामठी तांडा, चोंडी तर्फे शहापूर यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग दरेगाव, नागझरी, बेरूळा, उंडेगाव, दोडगांव, बोरजा, नांदखेडा, काठोडा तांडा ,लक्ष्मण नाईक तांडा ,सोनवाडी तर नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव महिला पूर, वसई , आमदरी, ब्राह्मणवाडा, निशाणा,  नागेशवाडी, राजदरी, काठोडा, जलालदाभा, आजरसोंडा तर सर्वसाधारण गांगलवाडी ,काकडदाबा , सुकापुर, वडद, आसोंदा ,तामठी तांडा, चोंडी तर्फे शहापूर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.अशी माहिती तहसीलदार हरीश गाडे यांनी दिली आहे.

ओबीसीच्या २७ जागापैकी ओबीसी  १० जागा महिला राखीव,१० जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग व ओबीसीच्या ०७ जागा ह्या सर्वसाधारण मध्ये टाकण्यात आले आहेत. तर एससी- एसटी आरक्षणाला धक्का नाही.अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी यापूर्वी काढण्यात आलेले आरक्षण कायम राहणार आहे. त्यामुळे ९ सप्टेंबरची प्रक्रिया केवळ नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षणापुरती होती. यावेळी तहसीलदार हरीश गाडे ,नायब तहसीलदार प्रवीण जोशी, निवडणूक नायब तहसीलदार प्रभाकर काळे, सचिन शिरसागर ,श्रीकृष्ण दराडे, इम्रान पठाण ,विनोद घोडके ,कैलास जाधव, गणेश जायभाय , विशाल भुक्तर यांच्यासह आरक्षण सोडतीच्या वेळी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

सेनगाव तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

सेनगाव तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

Gram Panchayat Sarpanch Reservation: सेनगाव तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची सुधारित आरक्षण सोडत बुधवारी ता.९ रोजी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Sep 09, 2026