अवकाळी पाऊस-गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मराठवाड्यातील परिस्थितीही चिंताजनक असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये येत्या चार दिवसांत, म्हणजेच २४ मार्चपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अवकाळी पाऊस-गारपीट; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

(Hailstorm Damage) विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रब्बी हंगामातील उत्पन्नाचे स्वप्न अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल २०१ गावांमध्ये सुमारे ३ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रावरील पिके या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील परिस्थितीही चिंताजनक असून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये येत्या चार दिवसांत, म्हणजेच २४ मार्चपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच नांदेड, हिंगोली, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग यांच्या अंदाजानुसार, मराठवाडा विभागात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम ते जोरदार पाऊस होत असून त्यामुळे फळबागांसह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून शासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे.

संबंधित सामग्री

उमरगा तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील खरीप धोक्यात; पावसाअभावी शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात

उमरगा तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील खरीप धोक्यात; पावसाअभावी शेतकरी पुन्हा कर्जाच्या विळख्यात

उमरगा तालुक्यात गेल्या चाळीस दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे.

Sep 02, 2026
18 राज्यांवर पावसाचे संकट! मुसळधार सरींसह मेघगर्जनेचा इशारा

18 राज्यांवर पावसाचे संकट! मुसळधार सरींसह मेघगर्जनेचा इशारा

Weather Rain Alert: देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाळा थांबलेला नाही. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, ओडिशा आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस खराब हवामान राहण्याची शक्यता

Aug 31, 2026
आज महाराष्ट्रात कुठे पाऊस? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज

आज महाराष्ट्रात कुठे पाऊस? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह सरींचा अंदाज

महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून, राज्यातील विविध भागांत आज हलक्या ते जोरदार सरींचा अंदाज आहे.

Aug 26, 2026
मान्सूनवर चक्रीवादळांचं संकट? ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’मुळे पावसात ब्रेकची शक्यता

मान्सूनवर चक्रीवादळांचं संकट? ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’मुळे पावसात ब्रेकची शक्यता

भारतामध्ये मान्सूनचा प्रवास सुरू असतानाच प्रशांत महासागरातील दोन शक्तिशाली चक्रीवादळांनी हवामान तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Aug 10, 2026
बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागाची लूट; प्रति बॅग नुसार अधिकारी पैसे घेतात, रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप 

बोगस बियाणे प्रकरणात कृषी विभागाची लूट; प्रति बॅग नुसार अधिकारी पैसे घेतात, रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप 

Bogus seed case: प्रति बॅग नुसार पैसे घेऊनच विभागातील अधिकारी कारवाई टाळत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला आहे.

Aug 05, 2026