हायव्होल्टेज मजुर जखमी

टेमली जंगलात थरारक अपघात: हायव्होल्टेज टॉवर लाईनखाली काम करताना मजुराला करंट, प्रकृती गंभीर!

High voltage Worker injured: मजूर शिवनंदन घाटघुमर (२६) टेमली ग्रामपंचायतत हायव्होल्टेज लाईन कटिंग कामात करंट सहसा होऊन गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचार नंतर त्या ब्रह्मपुरी रुग्णालयात रेफर करण्यात आले.

टेमली जंगलात थरारक अपघात: हायव्होल्टेज टॉवर लाईनखाली काम करताना मजुराला करंट, प्रकृती गंभीर!

High voltage Worker injured

कोरची (High voltage Worker injured) : कोरचीपासून सुमारे ७ किमी अंतरावर असलेल्या टेमली ग्रामपंचायत हद्दीत आज सकाळी एक धक्कादायक अपघात घडला. चंद्रपूरहून छत्तीसगडमधील रायपूर-भिलाईकडे जाणाऱ्या उच्चदाब (हायव्होल्टेज) टॉवर लाईनखाली झाडे व बांबू कटिंगचे काम सुरू असताना एका मजुराला विजेचा करंट लागून तो गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, टेमली येथील मंजूर शिवनंदन घाटघुमर (वय २६) हा मजूर जंगलातील टॉवर पोल परिसरात साफसफाई व झाडतोड करत असताना अचानक त्याला करंट लागला. जोरदार धक्का बसल्याने तो खाली कोसळला. सोबत असलेल्या मजुरांनी आरडाओरडा केल्याने आसपासचे लोक तातडीने घटनास्थळी धावले.

जखमी अवस्थेत त्याला तात्काळ कोरची ग्रामीण रुग्णालयात सकाळी सुमारे ११ वाजता दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील आस्था खाजगी रुग्णालयात रेफर केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. टेमली व बेडगाव येथील नागरिक तसेच बेडगावचे सरपंच चेतन किरसान व दिलीप कुळसंगे यांनी गंभीर आरोप केला की, टॉवर लाईनखाली सुरू असलेल्या धोकादायक ट्री-कटिंग कामावेळी पॉवर ग्रिड कंपनीचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता.

मजुरांच्या भरोशावरच हायव्होल्टेज लाईनखाली काम सुरू होते. गावकऱ्यांनी जखमी मजुराला तात्काळ आर्थिक मदत देण्याची तसेच संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मंजूर शिवनंदन घाटघुमर (२६)  हायव्होल्टेज टॉवर लाईनखाली ट्री-कटिंग दरम्यान करंट सध्या उपचार : ब्रह्मपुरी, आस्था रुग्णालय एवढ्या धोकादायक कामात सुरक्षा नियमांचे पालन का झाले नाही? अधिकारी गैरहजर का होते? ही घटना प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

संबंधित सामग्री

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचा धडाका; मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित, बीडमध्ये १.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईचा धडाका; मुंबईतील ४ हॉटेल्सचे परवाने निलंबित, बीडमध्ये १.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAकडून सुरू असलेल्या कारवाईची चर्चा सध्या राज्यभरात होत आहे.

Aug 08, 2026
तुकाराम मुंढे यांची मुंबईत मोठी कारवाई; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ हॉटेल्स, बेकरी आणि क्लबचे परवाने निलंबित

तुकाराम मुंढे यांची मुंबईत मोठी कारवाई; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ हॉटेल्स, बेकरी आणि क्लबचे परवाने निलंबित

अन्नसुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या विशेष अन्नसुरक्षा तपासणी मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Jun 30, 2026
कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिका कार्यालय भीषण आगीत जळून खाक

कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिका कार्यालय भीषण आगीत जळून खाक

Municipal office fire: कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिकेच्या कार्यालयात आगीच्या भयानक परिणामामुळे रेकॉर्ड जळल्यामुळे महत्त्वाच्या पडताळण्यांना अडचण येती. अग्निशमन व प्रशासनाची खराबी

Jun 17, 2026
हिंगोलीत तळणाच्या तेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अन्न-औषध प्रशासन आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

हिंगोलीत तळणाच्या तेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अन्न-औषध प्रशासन आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

Hingoli Oil Violation Action: हिंगोलीत हॉटेल, ढाबे आणि इतर व्यावसायिकांमध्ये तळण्याच्या तेलाचा पुनरापेक्ष सतत वापर करून फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Jun 11, 2026
खान सरांचे कोचिंग सेंटर बंद होणार? आधी शस्त्र कायदा, आता कोचिंग इन्स्टिट्यूट अडचणीत?

खान सरांचे कोचिंग सेंटर बंद होणार? आधी शस्त्र कायदा, आता कोचिंग इन्स्टिट्यूट अडचणीत?

Khan Sir Coaching Controversy: पटना येथील सुप्रसिद्ध शिक्षक आणि खान ग्लोबल स्टडीज (KGS) चे संचालक, फैसल खान, जे खान सर म्हणूनही ओळखले जातात, त्यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसते. गोळीबार आणि तोडफोड

Jun 07, 2026