हिंगोलीत भाजपाची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टीच्या वतीने मतदार यादी परिनिरीक्षण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

हिंगोलीत भाजपाची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

Hingoli BJP Meeting

हिंगोली (Hingoli BJP Meeting) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘SIR’ मतदार यादी परिनिरीक्षण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी आणि आगामी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीला जिल्हा प्रभारी संजय कौडगे, आमदार तान्हाजीराव मुटकुळे, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे, आतिश दांडेगावकर, उज्वला तांभाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘बूथ हीच पक्षाची खरी ताकद’ - संजय कौडगे

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा प्रभारी संजय कौडगे यांनी शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांशी संवाद साधला. "बूथ हीच पक्षाची खरी ताकद असून, आगामी काळात प्रत्येक बूथ सक्षम करणे हे आपले उद्दिष्ट आहे," असे ते म्हणाले. ‘SIR’ मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि मतदारांशी थेट संवाद साधण्याबाबत त्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच, लवकरच होणाऱ्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय निवासी कार्यशाळेच्या यशस्वी नियोजनासाठी पदाधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.

या बैठकीस जिल्हा सरचिटणीस सुनिताताई मुळे, उमेश नागरे, उमेश सोमाणी, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, शहराध्यक्ष रजनीश पुरोहित, पवन उपाध्ये, दिलीपराव देसाई, शशिकांत वडकुते, श्रीरंग राठोड, मंदाकिणी चव्हाण यांच्यासह माणिक लोढे, उमेश गुठ्ठे, कैलास शहाणे, ॲड. राजू गोटे, ॲड. सुनील भुक्तर, मिनाक्षी जामकर, दिनकर कोकरे, वर्षा खंदारे, सर्जेराव दिंडे, कैलाश श्रिनाथ, संदीप वाकडे, अशिष जयस्वाल, सुनिल राठौर, बाबा घुगे, समिर भिसे, अशिष शर्मा, अंकुश जैस्वाल, कोटकर, गुड्डू देवकते, शेख अतिक, चांदु लांडगे, शांतीरत्न थोरात यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित सामग्री

‘सत्तेसोबत जाणार नाही’; शरद पवारांची भूमिका स्पष्ट, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर पडदा?

‘सत्तेसोबत जाणार नाही’; शरद पवारांची भूमिका स्पष्ट, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर पडदा?

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांवर शरद पवारांची भूमिका स्पष्ट; सत्तेसोबत जाणार नसल्याचे सांगत विरोधी पक्षात येण्याचे आवाहन.

Sep 28, 2026
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.

Aug 25, 2026
शरद पवारांचा NDA प्रवेश होणार की नाही? बैठकीतच स्पष्ट उत्तर; ‘आपण विरोधातच आहोत’, कार्यकर्त्यांना संदेश

शरद पवारांचा NDA प्रवेश होणार की नाही? बैठकीतच स्पष्ट उत्तर; ‘आपण विरोधातच आहोत’, कार्यकर्त्यांना संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या NDA प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

Aug 17, 2026
भाजपच्या बैठकीत रटाळ भाषणांमुळे काहींची वामकुक्षी

भाजपच्या बैठकीत रटाळ भाषणांमुळे काहींची वामकुक्षी

Hingoli BJP Meeting: भाजपतर्फे कार्यकर्ता संमेलन व जिल्हा आढावा बैठक, यामध्ये ज्येष्ठ नेते मंडळींनी रटाळ भाषण केल्याने  काही पदाधिकार्‍यांनी चक्क वामकुक्षी घेतली तर काही मोबाईलमध्ये एकमग्न

Jul 05, 2026
चंद्रपूर भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळला; ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्षांची स्थगिती

चंद्रपूर भाजपमध्ये अंतर्गत कलह उफाळला; ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्षांची स्थगिती

चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत मतभेद अखेर उघडपणे समोर आले असून, नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आली आहे.

Jun 30, 2026