अरविंद मुंढे

हिंगोलीकरांच्या सहकार्यामुळेच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नगर पालिका राज्यस्तरावर झळकली: अरविंद मुंढे

Arvind Mundhe: पालिकेत काम करतांना नागरीकांनी दाखविलेले प्रेम व विश्वास कधीही विसरू शकणार नाही, नागरीकांच्या सहकार्यामुळे हिंगोली पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यस्तरावर

हिंगोलीकरांच्या सहकार्यामुळेच स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नगर पालिका राज्यस्तरावर झळकली: अरविंद मुंढे

Arvind Mundhe

हिंगोली (Arvind Mundhe) : पालिकेत काम करतांना नागरीकांनी दाखविलेले प्रेम व विश्वास कधीही विसरू शकणार नाही, नागरीकांच्या सहकार्यामुळे हिंगोली पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यस्तरावर क्रमांक मिळवू शकलो असे प्रतिपादन तत्कालीन मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी केले.

हिंगोली येथील पालिकेच्या सभागृहात  तत्कालीन मुख्याधिकारी मुंढे यांचा बदली झाल्याबद्दल सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष माबूद बागवान, नगरसेवक आमेर अली, गुड्डू बांगर, नाना नायक, कैलास शहाणे, आरेफ लाला, रामकिशन बांगर, मुजीब कुरैशी, साद अहेमद, कपिल खंडेलवाल, विशाल गोटरे, खली बांगर, रत्नाकर अडशिरे, शाम माळवटकर, बाळू बांगर, प्रतिक नाईक, पंडीत मस्के, संदिप घुगे,  स्वप्निल बोराटे, नगररचनकार प्रविण मोहेकर, गजानन काळे, रामेश्वर चाटे, स्नेहल आवटे, साहेब भुरके, सचिन पवार, विजय रामेश्वरे, गोविंद चव्हाण, गणेश धनगर, आकाश देशमुख, शिवाजी घुगे, वैâलास थिटे, राजेश डहाळे, मनोज बुरसे, शेख साजीद, प्रविण चव्हाण, मोरे यांच्यासह नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्याधिकारी मुंढे म्हणाले की, हिंगोली पालिकेत मागील चार वर्षात काम करतांना सर्वच नागरीक, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य मिळाले. नागरीकांच्या पाठबळावरच स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वीपणे राबविता आले. या शिवाय वृक्ष लागवड अभियान, स्वच्छ शहर सुंदर शहर यासह इतर संकल्पना राबविता आल्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये हिंगोली पालिकेचा राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. या शिवाय या अभियानात सातत्य राखण्यात यश मिळाले आहे. हिंगोली शहराच्या विकासासाठीही सर्वांचे सहकार्य मिळाले असून प्रत्येक प्रभागात रस्ते कामांसह मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. 

शहराच्या भल्यासाठीच काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागले. यामध्ये प्रामुख्याने अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा असून यावेळीही नागरीकांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले हे पालिकेवरील तसेच माझ्यावरील विश्वासाचे द्योतक असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम आपल्या कार्यकाळात सुरु झाले याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात हिंगोलीत काम करण्याची संधी मिळाली तर पुन्हा एकदा काम करण्यास नक्कीच आवडेल असे त्यांनी सांगितले. सुत्रसंचालन पंडीत मस्के यांनी केले.

संबंधित सामग्री

हिंगोली न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांची वाशिमला बदली

हिंगोली न.प. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांची वाशिमला बदली

Arvind Mundhe: अरविंद मुंढे यांनी हिंगोलीच्या प्रमुखपदीून वाशिम नगरपालिकेवर पदभार स्वीकारला. त्यांना स्वच्छ भारत आणि शहर सुधारणा या क्षेत्रात काम करण्यात प्रचारित केले आहे.

Jun 17, 2026