गंभीर गुन्हे निकाली निघत नसल्याने वरिष्ठांना निर्णय घ्यावा लागणार
हिंगोली (Hingoli Crime Branch) : जिल्ह्यांमध्ये गंभीर गुन्हे निकाली निघत नसल्याने पोलीस दलाचा आरसा समजला जाणार्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पदभाराचा खांदा बदलण्याची वेळ आली आहे. या संदर्भात आता वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे अन्यथा गुन्ह्याची प्रमाण सतत वाढत राहणार असून गुन्हे निर्गती देखील कमी होणार असल्याने त्याचा परिणाम जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीवर होणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखा (Hingoli Crime Branch) म्हणजे जिल्हा पोलीस दलाचा आरसा समजला जातो जिल्ह्यात घडणार्या महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्याची जिम्मेदारी स्थानिक गुन्हे शाखेवर सोपवली जाते त्यासाठी गुन्हे शाखेकडे स्वतंत्र यंत्रणा असते मोठ्या घरफोडी जबरी चोर्या खूनाच्या घटना यासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये स्थानिक पोलीस ठाण्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असतात कठीण समजल्या जाणार्या गुन्ह्यांच्या तपासाची जिम्मेदारी स्थानिक गुन्हे शाखेवर सोपवली जाते त्यानुसार हिंगोली पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे मोठ्या प्रमाणावर गुन्हे तपासासाठी सोपविण्यात आले आहेत मात्र त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अपयश आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे (Hingoli Crime Branch) अधिकारी व 'कर्मचारी जुगार व इतर अवैध व्यवसायाची माहिती घेऊन जुगारांसोबत साटे लोटेकरत गुन्हे दाखल करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गुन्हे शाखेच्या पथकाकडून मटका वर जुगार अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात कधी दोन हजार रुपये तर कधी पाच हजार रुपये पर्यंत ची रक्कम जप्त केली जाते मात्र जप्त केलेल्या रकमेचा आकडा फुगवून दाखवण्यासाठी घटना स्थळावरील दुचाकी वाहने जुगार यांचे मोबाईल यांच्या किमती जप्ती मध्ये दाखवून छाप्यामध्ये मोठी रक्कम जप्त केल्याचे दाखवत गुन्हे शाखा पाठ थोपटून घेऊ लागली आहे.
जिल्ह्यात मागील चार ते पाच महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेची (Hingoli Crime Branch) झालेली सुमार कामगिरी लक्षात घेता आता गुन्हे शाखेच्या पदभाराचा खांदा बदलण्याची वेळ आली आहे. या संदर्भात नागरिकां कडूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागले आहेत पदभाराचा खांदा न बदलल्यास मोठ्या संख्येने गुन्हे प्रलंबित राहण्याची जबाबदारी पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकार्यांना घ्यावी लागणार आहे त्यामुळे राज्यामध्ये हिंगोली जिल्ह्याची कामगिरी इतर राज्याच्या तुलनेमध्ये कमी दिसणार आहे त्याचा परिणाम पोलीस दलाला भोगाव लागणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने योग्य निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.