हिंगोली डिझेल टंचाई

हिंगोली जिल्ह्यात डिझेल टंचाईने हाहाकार, पंपावर लांबच लांब रांगा

Hingoli Diesel Shortage: हिंगोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून डिझेलचा टंचाई झालेला आहे, कारणातील प्रमुख पेट्रोल पंपांवर डिझेलच संपलेले आहे.

हिंगोली जिल्ह्यात डिझेल टंचाईने हाहाकार, पंपावर लांबच लांब रांगा

Hingoli Diesel Shortage

 

मोठमोठे कॅन व बॅरल घेवून आलेल्या शेतकर्‍यांना कोणी डिझेल देता का डिझेल म्हणण्याची आली वेळ

हिंगोली (Hingoli Diesel Shortage) : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. कुठे वादावादी तर कुठे हमरी-तुमरी असे चित्र प्रत्येक पेट्रोल पंपावर दिसून येत आहे. ट्रॅक्टर चालक, ट्रकचालक आणि शेतकरी यांच्यावर तर 'कुणी डिझेल देता का डिझेल' असे म्हणायची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील प्रमुख आठ पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे उर्वरित पंपांवर डिझेलसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. सकाळ पासूनच नागरिक मोठ-मोठे कॅन, बॅरल घेऊन पंपावर रांगा लावत आहेत. अनेक ठिकाणी तासन् तास उभे राहूनही डिझेल मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टरचालकांची सर्वाधिक गैरसोय होत आहे. शेतात नांगरणी, वखरणीची कामे खोळंबली असून डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद पडले आहेत.

या परिस्थितीचा फायदा घेत काही ठिकाणी चढ्या दराने डिझेल विक्री (Hingoli Diesel Shortage) होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. पंपावर होणार्‍या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होत असून काही ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकारही घडले. पोलिसांना पाचारण करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. मालवाहतूक करणार्‍या ट्रकचालकांचेही प्रचंड नुकसान होत आहे. वेळेवर माल पोहोचवता न आल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या काही फेर्‍यांवरही या टंचाईचा परिणाम जाणवू लागला आहे.

डिझेल टंचाईचे (Hingoli Diesel Shortage) नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पुरवठा साखळीत बिघाड झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. तेल कंपन्यांकडून पुरवठा कमी झाल्याने पंपचालक हतबल झाले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता, 'परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. लवकरच अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्यासाठी तेल कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये व साठेबाजी करू नये' असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, डिझेलसाठी होणारी ही वणवण कधी थांबणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तोपर्यंत मात्र 'डिझेलसाठी रांग' हेच चित्र जिल्ह्यात कायम राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७१ पेट्रोलपंप

हिंगोली जिल्ह्यात एकूण ७१ पेट्रोपपंप आहेत. त्यातील बहुतांशी पेट्रोलपंपावरील डिझेल संपले होते. काही पेट्रोलपंपावर डिझेल तुरळक प्रमाणात होते. परंतु गर्दी अधिक असल्याने पेट्रोपपंप चालकांनी डिझेल वाटप बंद केले होते. त्यामुळे काही ठिकाणी शेतकरी संतप्त झाले होते. काही पंपावर डिझेल नसतानाही डिझेलची मागणी केली जात होती. त्यामुळे काही पेट्रोपपंप चालक शेतकर्‍यांना हात जोडून विणवणी करीत होते.

हिंगोलीत पेट्रोल पंपावर पोलीस संरक्षणाची मागणी, डीलर असोसिएशनचे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला निवेदन
जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पसरलेल्या भीती व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंप डीलर असोसिएशनने पेट्रोल पंपांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात हिंगोली जिल्हा पेट्रोल पंप डीलर असोसिएशनने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, हिंगोली यांना लेखी निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, सध्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण असून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तात्काळ पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा.  असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या या मागणीकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांमध्ये सध्याच्या परिस्थितीमुळे चिंतेचे वातावरण आहे.

संबंधित सामग्री

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

घोषणांचा पाऊस नको, अंमलबजावणी कधी? ते सांगा!

औसा तालुक्यातील तावशी (ताड) येथे आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Sep 27, 2026
दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

फडणवीसांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान विजय वडेट्टीवारांनी 31,628 कोटींच्या पॅकेजवर सवाल करत शेतकऱ्यांना किमान 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली.

Sep 23, 2026
 दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

दुष्काळी पाहणी दौऱ्यावर फडणवीस; ‘मागच्या 31,628 कोटींच्या पॅकेजचं काय झालं?’ वडेट्टीवारांचा फडणवीसांना थेट प्रश्न

फडणवीसांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान विजय वडेट्टीवारांनी 31,628 कोटींच्या पॅकेजवर सवाल करत शेतकऱ्यांना किमान 50 हजारांची मदत देण्याची मागणी केली.

Sep 23, 2026
शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेले अधिकारी परतले

सिंदगी येथे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी मोजणीला शेतकरी व ग्रामस्थांचा विरोध; मोजणी न करताच महसूल विभागाचे पथक परतले.

Sep 22, 2026