हिंगोली जिल्हा विकास

पालकमंत्र्यांच्या विकासाचे आश्वासन कधी पूर्ण होणार; जिल्ह्यात महत्त्वाचे प्रश्न रखडलेले

Hingoli District Development: जिल्ह्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न तसेच विकास कामे रखडली असून केवळ झेंडावंदनासाठी येणार्‍या पालकमंच्यांच्या विकासाचे आश्वासन कधी पूर्ण होणार, असा अहवाल हिंगोलीकर

पालकमंत्र्यांच्या विकासाचे आश्वासन कधी पूर्ण होणार; जिल्ह्यात महत्त्वाचे प्रश्न रखडलेले

Hingoli District Development

हिंगोली (Hingoli District Development) : जिल्ह्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न तसेच विकास कामे रखडली असून केवळ झेंडावंदनासाठी येणार्‍या पालकमंच्यांच्या विकासाचे आश्वासन कधी पूर्ण होणार, असा अहवाल हिंगोलीकरांमधून उपस्थित केला जात आहे. 

हिंगोली जिल्हा (Hingoli District Development) गरीब जिल्हा असल्याचे सांगत पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतानाच अपशकुन केलेल्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोलीच्या विकास कामासाठी तसू भरही प्रयत्न केले नाहीत.  हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले मात्र झेंडा मंत्री असलेल्या झिरवळ यांनी शेतकर्‍यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलेच नाही.  त्यामुळे हिंगोली मध्ये शेतकर्‍यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे.  यामुळे शेतकर्‍यांमधून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. याशिवाय हिंगोली जिल्ह्यांमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठलेही नवीन उपक्रम राबविण्यात आले नाहीत. उलट जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या शाळा बंद करून शेकडो विद्यार्थिनींना शिक्षणाचा मार्ग बंद केला आहे.

यामुळे हिंगोलीच्या निपुण हिंगोली अभियानाला मोठी चपराक बसली असली तरी पालकमंत्र्यांकडून याबाबत कुठल्याही प्रकारची विचारणा करण्यात आली नाही.  जिल्ह्यातील अनेक शाळा आज शेवटच्या घटका मोजत आहेत मात्र शाळा दुरुस्तीच्या नावाखाली सुस्थितीत असलेल्या शाळांनाच वारंवार अर्थपूर्ण निधी देत दुरुस्ती केली जात आहे त्यामुळे अखेरच्या घटका मोजणार्‍या शाळा कधी दुरुस्त होणार असा अहवाल विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.  शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आश्वासन देणार्‍या पालकमंत्र्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही हिंगोलीला बैठकीत आल्यानंतर पालकमंत्री झिरवाळ यांच्याकडून पुढे पंधरा दिवसात विकास कामांबाबत अधिकार्‍यांची स्वतंत्र बैठक घेऊ असे सांगून वेळ मारून दिली जात आहे मागील तीन ते चार बैठकांमधून हाच प्रकार झाला आहे त्यामुळे अधिकार्‍यांच्या सोबत प्रत्यक्ष बैठक घेण्यात पालकमंत्री चांगलेच अपयशी ठरल्याचे चित्र आहे त्यामुळे हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीमधील अनेक प्रश्न आजही कायम आहेत.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये (Hingoli District Development) स्मशानभूमी साठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना पालकमंत्र्यांकडून मात्र रस्ते गट्टू बसवणे विद्युतीकरण या कामांनाच प्राधान्य दिले जात आहे याबाबतचे गौडबंगाल मात्र कायम आहे. जिल्ह्यातील आजही बहुतांश गावांमधून स्मशानभूमी तसेच स्मशानभूमी मध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अंतिम संस्कार साठी ही जीवघेणी धडपड सुरू आहे आणि ठिकाणी पावसाळ्यात गुडघाभर पाण्यामधून मृतदेह न्यावा लागतो तर पावसामध्ये उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठका प्रत्यक्ष अधिकार्‍यांच्या उपस्थितीत होणे अपेक्षित असताना आजपर्यंत एकही बैठक प्रत्यक्ष उपस्थितीत झाली नाही केवळ ऑनलाइन बैठकांचे सोपस्कार पार पडून जे कंत्राटदार ठरवून दिलेल्या स्वीय सहायकांना भेटतात त्यांनाच कामाचे कंत्राट दिले जात असल्याचे चित्र मागील दोन वर्षात पाहायला मिळाले आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये आरोग्याचा प्रश्नही गंभीर असून केवळ रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रुग्णांना गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे मात्र या प्रश्नाकडेही पालकमंत्र्यांकडून साफ दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे पालकमंत्री झिरवळ यांचे होणारे दुर्लक्ष हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांच्या संतापाचा विषय बनले आहे आता पालकमंत्री जिल्ह्याच्या विकासासाठी कधी पुढाकार घेणार असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

पक्ष वाढीसही उपयोग शुन्य

जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढावी म्हणून वसमतचे आमदार राजू भैया नवघरे यांनी आग्रहाने पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असावा अशी भूमिका घेतली नवघरे यांच्या आग्रहास्तव काय अजितदादा पवार यांनी नरहरी झिरवळ यांना हिंगोलीचे पालकमंत्री पद दिले परंतु झिरवळांच्या पालकत्वाचा हिंगोलीत पक्ष संघटनेला शून्य उपयोग झाला पालकमंत्री पदावर बसल्यापासून आजपर्यंत त्यांनी एकही कार्यकर्त्यांची बैठक घेतली नाही शिवाय पक्षातील कार्यकर्त्यांचे शासन दरबारी असलेले कोणतेही काम करण्यास पालकमंत्र्यांकडून कधीच मदत झाली नाही अशी तक्रार राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी करीत आहेत.