हिंगोली (Hingoli Police Force) : जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात एका नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. बॉम्ब व स्फोटक शोधक श्वान पथकात नव्याने दाखल झालेल्या श्वानाचे नामकरण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा यांच्या हस्ते करण्यात आले असून त्याचे नाव 'जॅक' असे ठेवण्यात आले आहे.
पोलीस दलात दाखल झालेल्या या नव्या श्वानाच्या संगोपन आणि पुढील प्रशिक्षणाची जबाबदारी श्वान हस्तक पोलीस हवालदार माधव मुटकुळे व पोलीस शिपाई प्रविण बांगर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या (Hingoli Police Force) नामकरण सोहळ्याप्रसंगी बॉम्ब शोधक व नाशक पथक हिंगोलीचे पोलीस उपनिरीक्षक नागरे, पोलीस शिपाई ठाकरे यांच्यासह पथकातील कर्मचारी उपस्थित होते. 'जॅक' च्या समावेशामुळे हिंगोली जिल्हा पोलीस दलाची बॉम्ब शोधक क्षमता अधिक बळकट होणार असून, जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.