हिंगोली दसरा महोत्सव

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी, १७२ वर्षांची परंपरा

Hingoli Dussehra Festival: थील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनाची पूर्वतयारी जोमात सुरू झाली असून यावर्षी ऐतिहासिक दसरा महोत्सव १७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांसापूजन

हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाची जय्यत तयारी, १७२ वर्षांची परंपरा

Hingoli Dussehra Festival

हिंगोली (Hingoli Dussehra Festival) : येथील सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या आयोजनाची पूर्वतयारी जोमात सुरू झाली असून यावर्षी ऐतिहासिक दसरा महोत्सव १७२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बांसापूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. रामलीला मैदानावरील दसरा कार्यालयात श्री हनुमानजींच्या मूर्ती, हत्ती, घोडे आदींचे नूतनीकरण करण्यात येत आहे. वेळूच्या बांबूपासून कमड्याद्वारे विविध पुतळे तयार करण्याचे काम सुरू असून रावणाच्या मुखवट्याचे काम मूर्तिकार बाबुलाल बमरुले, दीपक बमरुले व सहकाऱ्यांमार्फत सुरू आहे. यावेळी भास्कर इंगोले, मधुकर खंडागळे, दौलत बनसोडे, विश्वास नायक, गणेश साहू, गणेश धाबे आदी उपस्थित होते.

कृषी व औद्योगिक प्रदर्शनीचे स्टॉल उभारणीचे काम सुरू असून आकाश पाळणे, झुले क्रेनच्या सहाय्याने उभारले जात आहेत. मैदानाच्या पश्चिम भागात बच्चे कंपनीसाठी चक्री व लहान पाळणे सुरू झाल्याने महिला व नागरिकांची वर्दळ वाढली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दसरा महोत्सवामुळे मनोरंजन व घरगुती साहित्य माफक दरात मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावर्षी (Hingoli Dussehra Festival) दसरा महोत्सव शासनामार्फत दसरा महोत्सव समिती, विश्वस्त मंडळ व इतर समित्यांमार्फत साजरा करण्यात येणार आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सव; प्रदर्शनीतील झुले व दुकानांचा लिलाव बारगळला

हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सव; प्रदर्शनीतील झुले व दुकानांचा लिलाव बारगळला

Hingoli Dussehra Festival: प्रसिध्द असलेल्या श्री सार्वजनिक दसरा महोत्सवाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारली. २८ सप्टेंबरला प्रदर्शनीतील झुले व दुकानांच्या लिलावाची प्रक्रीया घेण्यात आली.

Sep 28, 2026
हिंगोलीच्या दसर्‍याची प्रशासनाने पुर्वी सारखी स्विकारली जबाबदारी

हिंगोलीच्या दसर्‍याची प्रशासनाने पुर्वी सारखी स्विकारली जबाबदारी

Hingoli Dussehra Festival: जिल्हा प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक दसरा महोत्सव समिती अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यंदाही परंपरागत सार्वजनिक दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती

Sep 22, 2026
हिंगोलीचा दसरा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी महसुल मंत्र्यांना आ. तान्हाजी मुटकुळेंनी दिले पत्र

हिंगोलीचा दसरा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी महसुल मंत्र्यांना आ. तान्हाजी मुटकुळेंनी दिले पत्र

Hingoli Dussehra Festival: ऐतिहासिक दसरा महोत्सव २०१६ हा प्रशासनामार्फत साजरा करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याकरीता आ. तान्हाजी मुटकुळे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्र पाठविले

Sep 16, 2026
हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव प्रशासनानेच साजरा करावा

हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव प्रशासनानेच साजरा करावा

Hingoli Dussehra Festival: देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व प्रसिद्ध मानला जाणारा हिंगोलीचा ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सव २०२६ प्रशासनामार्फतच साजरा करावा

Aug 31, 2026
हिंगोलीचा सार्वजनिक दसरा महोत्सव निवडणूक व एसआयआर कामांमुळे साजरा करणे शक्य नाही 

हिंगोलीचा सार्वजनिक दसरा महोत्सव निवडणूक व एसआयआर कामांमुळे साजरा करणे शक्य नाही 

Hingoli Dussehra Festival: ग्रामपंचायत निवडणूक व संभाव्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल यंत्रणेवर मोठा ताण येणार असून यामुळे हिंगोलीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव साजरा

Aug 03, 2026