हिंगोली बकरी ईद

हिंगोलीत बकरी ईद निमित्त उद्या वाहतूक मार्गात बदल

Hingoli Bakri Eid: हिंगोली शहरात ईद निमित्त ईदगाहसाठी नमाजसाठी एकत्र येणाऱ्या हजारो मुस्लिम बांधवांसाठी सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत काही प्रमुख मार्ग बंद करण्यात आले

हिंगोलीत बकरी ईद निमित्त उद्या वाहतूक मार्गात बदल

Hingoli Bakri Eid

 

सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत ‘या’ मार्गावर बंदी

हिंगोली (Hingoli Bakri Eid) : बकरी ईद निमित्त उद्या, 28 मे रोजी हिंगोली शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. औंढा रोडवरील ईदगाह येथे नमाजसाठी हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधव एकत्र येणार असल्याने शहरातील काही प्रमुख मार्ग सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये ही अधिसूचना जारी केली आहे.

नमाजाच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नांदेड नाका, एन.टी.सी. गेट, बसस्टँडच्या पूर्वेकडील गेट, बावन खोली रोड तसेच संभाजी शाळेजवळील रस्त्यावरून ईदगाहकडे जाणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. याशिवाय कयाधू नदीकडून नांदेड नाक्याकडे येणारा मार्गही वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

जड वाहनांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. नर्सी टी पॉईंट, खटकाळी बायपास आणि अकोला बायपास या मार्गावरून हिंगोली शहरात येणाऱ्या सर्व जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत. (Hingoli Bakri Eid) औंढा किंवा सेनगावकडे जाणाऱ्या वाहनांनी इंदिरा चौक, गांधी चौक, फुल मंडी, गोदावरी कॉर्नर, मेहराज उलुम मस्जिद, खाकी बाबा चौक, कब्रस्तान मार्गे कयाधू नदी पूल व नर्सी टी पॉईंटचा वापर करावा. नांदेडकडे जाण्यासाठी इंदिरा चौक, नांदेड नाका, रेल्वे गेट, खटकाळी बायपास मार्गे उमरा पाटीने जावे. वाशिमकडून नांदेडकडे जाणारी जड वाहने अकोला बायपास ते खटकाळी बायपास मार्गे वळविण्यात आली आहेत. दरम्यान, डॉ. आंबेडकर चौक, गांधी चौक, इंदिरा चौक, नांदेड नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, उद्या सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 02456-220232 वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

संबंधित सामग्री

अवैध धंद्याची माहिती दडविल्याने बळसोंडच्या पोलिस पाटील महिलेवर निलंबनाची कारवाई

अवैध धंद्याची माहिती दडविल्याने बळसोंडच्या पोलिस पाटील महिलेवर निलंबनाची कारवाई

Police Patil Suspension: अकोला बायपास ते गारमाळ जाणार्‍या रस्त्यालगत पोलिसांनी टाईम बाजार मटका जुगारावर छापा मारला होता. कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असल्यास त्याची माहिती पोलिस..

Aug 19, 2026
वसमत तालुक्यातील खंदारबन येथील रास्तभाव दुकानाची जाहीर प्रगटन प्रक्रिया स्थगित

वसमत तालुक्यातील खंदारबन येथील रास्तभाव दुकानाची जाहीर प्रगटन प्रक्रिया स्थगित

Vasmat Rashan Shop: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांचेकडील शासन निर्णय दि. ६ जुलै २०१७ अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकूण ६८ रास्तभाव दुकानांसाठी जाहीर प्रगटन

Aug 07, 2026