हिंगोली कर्मचारी पदोन्नती

हिंगोली जिल्ह्यातील 16 कर्मचाऱ्यांना पदोन्नती; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले आदेश

Hingoli Employee Promotion: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील महसूल विभागातील एकूण 16 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे आदेश मंजूर करून निर्गमित केले आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील 16 कर्मचाऱ्यांना पदोन्नती; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले आदेश

Hingoli Employee Promotion

 

हिंगोली (Hingoli Employee Promotion) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील महसूल विभागातील एकूण 16 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचे आदेश मंजूर करून निर्गमित केले आहेत. सदर पदोन्नती आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मान्यतेने काढण्यात आले असून बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या पदोन्नतींना अखेर मार्ग मोकळा झाला आहे.

मंजूर झालेल्या आदेशानुसार तलाठी संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात 8 कर्मचाऱ्यांना, महसूल सहायक संवर्गातून सहायक महसूल अधिकारी संवर्गात 2 कर्मचाऱ्यांना आणि शिपाई संवर्गातून लिपिक संवर्गात 6 कर्मचाऱ्यांना अशी एकूण 16 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

यामध्ये मंडळ अधिकारी पदी अमोल घोंगडे, चंद्रकांत धुमाळ, प्रदीप इंगोले, वामन राठोड, संजीव कुमार लोंढे, सुमित्रा रोकडे, मोनाली गोटे, देविदास गायकवाड, यांना पदोन्नती मिळाली आहे. तर सहायक महसूल अधिकारी पदी सय्यद अनवर सय्यद मनोहर, प्रवीण रणवीर, यांचा समावेश असून लिपिक संवर्गात संतोष चव्हाण, राजेश पांचाळ, कैलास जाधव, विजय चांदणे, दिपाली जाधव, कैलास कावरखे, यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

या (Hingoli Employee Promotion) पदोन्नतीमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळणार असून पदोन्नती प्राप्त सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.