हिंगोली फटाका स्फोट

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion

हिंगोली (Hingoli Firecracker Explosion) : शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात विनापरवाना बेकायदेशीररित्या फटाके साठवून ठेवल्याने आग लागून स्फोट झाला आणि या स्फोटात तिघांचा मृत्यू तर दहा जण जखमी यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मयतावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली भागातील आरोपी विजयकुमार रामकृष्ण बासटवार यांनी स्वतःच्या घरात विनापरवाना बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात फटाके ठेवले होते. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास कशानेतरी त्या फटाक्यांना आग लागली. आगीमुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात घरमालक विजयकुमार बासटवार यांचा मृत्यू झाला.तसेच शेजारी राहणार्‍या इतरांचे घर आणि मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले. या स्फोटात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

मयतांमध्ये आरोपी विजयकुमार बासटवार यांच्यासह अविनाश काशिनाथ बांगर, रा. वंजारवाडा आणि दिलीप रंगनाथराव दोडके, नगर परिषद कर्मचारी, रा. नगर परिषद कॉलनी हिंगोली यांचा समावेश आहे. तर या दुर्घटनेत राजगोपाल बासटवार, श्रावणी बासटवार, आकाश सांगळे, कृष्णा आग्रवाल, रवि कांबळे, कपिल खंडेलवाल, भरत चौधरी, अमित चौधरी, सुशील बांगर आणि अनुप आग्रवाल असे १० जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर हिंगोली, लातूर व छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू  आहेत. 

या (Hingoli Firecracker Explosion) प्रकरणी  ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शैलेश नांदेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत आरोपी विजयकुमार बासटवार हे स्वत:सह इतर दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. तसेच यामध्ये काहीजण जखमी झाल्याने  मयत विजयकुमार बासटवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.एन. बनसोडे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026