हिंगोली हॉटेल परवाना रद्द

अस्वच्छतेच्या  कारणा वरून हिंगोलीतील  प्रसिध्द महाराज भजीयेवाला हॉटेलचा परवाना रद्द

Hingoli hotel license cancelled: महाराज भजीयेवाला हॉटेलच्या स्वच्छतेच्या गैरव्यवस्थेशी संबंधित अस्वच्छतेचा खुलासा करून, अन्न व औषध प्रशासनाने पथकाने परवानगी रद्द केली.

अस्वच्छतेच्या  कारणा वरून हिंगोलीतील  प्रसिध्द महाराज भजीयेवाला हॉटेलचा परवाना रद्द

Hingoli hotel license cancelled

हिंगोली (Hingoli hotel license cancelled) : शहरातील जुन्या  जिल्हा  परिषद इमारतीसमोर मुगाच्या भज्याकरीता प्रसिध्द  असलेल्या महाराज भजीयेवाला हॉटेलमध्ये अस्वच्छतेच्या कारणावरून अन्न व औषध प्रशासनाच्या  पथकाने ११ ऑगस्टला हॉटेलचा   परवाना रद्द करून कारवाई केली.

हिंगोली शहरात जिल्हा  परिषदेच्या जुन्या इमारतीसमोर महाराज भजीयेवाला हे हॉटेल मुगाच्या भज्याकरीता आणि खिचडीसाठी प्रसिध्द  आहे. भाजपच्या   प्रिती जैस्वाल यांनी दोन दिवसापुर्वी या हॉटेलमधून खिचडी मागविली असता त्यात दोन अळ्या आढळून आल्या होत्या. या बाबत सोशल मिडियावर व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय व अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली  होती. यावरून अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त पवन खताळ, अन्न सुरक्षा अधिकारी राजश्री सावंत, लोंढे यांच्या  पथकाने हॉटेलमध्ये जावून तपासणी केली असता तेथे अस्वच्छता दिसून आली. तसेच खाद्य पदार्थ तयार करताना योग्यती काळजी घेतली नसल्याने पथकाने हॉटेलचा परवाना रद्द केला. त्यामुळे हे हॉटेल बंद करण्यात आले असून अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने हॉटेल व्यवसायीकात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित सामग्री

अबब...परभणीतील आहेरवाडीच्या शाहू विद्यालयातील पोषण आहारात किडे!

अबब...परभणीतील आहेरवाडीच्या शाहू विद्यालयातील पोषण आहारात किडे!

Shahu Vidyalaya Nutritional Meal: शाहू विद्यालयातील पोषण आहाराचे ढळकलेल्या ४२ पोतांच्या अनन्नधान्यांमध्ये किडे आढळून आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ सुरू झाली. तपासणीमध्ये अधिकारी सीलबंद

Jul 17, 2026