हॉस्पिटलच्या मानवतेला सलाम
हिंगोली (Hingoli Lakshmi Life Care Hospital) : हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्णपणे मोफत उपचार करण्यात आले.
संकटाच्या काळात माणुसकीला प्राधान्य देत केलेली ही सेवा निश्चितच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही विविध संकटांच्या प्रसंगी रुग्णसेवा व सामाजिक बांधिलकी जपत हॉस्पिटलने अशीच संवेदनशील भूमिका निभावली आहे.
ही केवळ वैद्यकीय सेवा नाही, तर खरी माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीचे उदाहरण आहे. लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमला या सेवेबद्दल सर्व स्तरातून कौतुक आणि मनःपूर्वक सलाम करण्यात येत आहे.