हिंगोली (Hingoli Municipal Council) : शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला काढलेल्या शासन आदेशात हिंगोली नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदी परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी १० ऑगस्ट सोमवारी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला.
राज्यातील २३ नगर पालिका व नगर पंचायत कार्यालयामध्ये शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला शासन निर्णयाव्दारे परिविक्षाधिन मुख्याधिकार्यांच्या नियुत्तäया करण्यात आल्या. ज्यामध्ये हिंगोली न.प. मुख्याधिकारी पदी श्रीमती प्रांजली मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार १० ऑगस्ट सोमवार रोजी त्यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारला. मुख्याधिकारी म्हणुन पदभार स्विकारणार्या ह्या पहिला महिला परिविक्षाधिन मुख्याधिकारी आहेत. यावेळी उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, स्थापत्य अभियंता स्नेहल आवटे यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी रामेश्वर चाटे, संदिप घुगे, पंडीत मस्के, आकाश देशमुख, ललिता खंदारे, चित्रा वर्मा यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
हिंगोली नगर पालिकेत पहिल्या महिला परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी स्विकारला पदभार
Hingoli Municipal Council: शासनाच्या नगर विकास विभागाने ७ ऑगस्टला काढलेल्या शासन आदेशात हिंगोली नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदी परिविक्षाधिन मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांची नियुक्ती
Hingoli Municipal Council
संबंधित सामग्री
उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना युतीत पुन्हा तणाव; भाजप सत्तेतून बाहेर, श्रीकांत शिंदेंना सहकार्य न करण्याचा निर्णय
स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप-शिवसेना वाद वाढला असून भाजपने उल्हासनगर महापालिकेतील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया
मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.
मृत्यूची नोंद वेळेत करा! १ ऑक्टोबरपासून विलंब झाल्यास वाढणार सरकारी प्रक्रिया
१ ऑक्टोबरपासून मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल होणार असून, विलंब झाल्यास दंडाधिकाऱ्यांच्या आदेशासह अतिरिक्त कागदपत्रे आणि पडताळणी आवश्यक राहणार आहे.
पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून खळबळ; आमदाराची आयुक्तांना धमकी, अधिकाऱ्यांनाही दमबाजी
पुण्यातील ९० कोटींच्या वेलस्ली रस्ता निविदेवरून वाद; आमदाराने आयुक्तांना धमकी दिल्याचा आरोप, तर अधिकाऱ्यांनाही हक्कभंगाची दमबाजी.
भाईंदरमध्ये पर्युषण पर्वावरून पुन्हा वाद; मेथीच्या भाजीवरून विद्यार्थ्याला दंड, तपोवन विद्यालयाला नोटीस
भाईंदरच्या तपोवन विद्यालयात मेथीची भाजी डब्यात आणल्याने विद्यार्थ्यावर दंडात्मक कारवाई झाल्याचा आरोप. मनसेच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाची नोटीस.