हिंगोली मोकाट जनावर ठराव

हिंगोलीतील मोकाट जनावर,भटक्या कुत्र्यासह आदींचे ठराव पारीत

Hingoli Stray Animals: हिंगोली नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केंद्रीय निवारण केंद्र, जनावरांची ठिकाने, भु-नक्शा मोजणी व इतर १६ ठरावांना एकमताने पारित केला.

हिंगोलीतील मोकाट जनावर,भटक्या कुत्र्यासह आदींचे ठराव पारीत

Hingoli Stray Animals

हिंगोली (Hingoli Stray Animals) : शहरातील मोकाट जनावरे व भटक्या  कुत्र्याचा  बंदोबस्त  करून कायमस्वरूपी निवारा केंद्र उभारण्यासह इतर अनेक  महत्वाचे ठराव हिंगोली नगर पालिकेच्या सर्व साधारण सभेत पारीत करण्यात आले.

२५ ऑगस्ट रोजी हिंगोली नगर पालिकेत नगराध्यक्षा सौ. रेखाताई  श्रीराम बांगर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व साधारण  सभा घेण्यात आली. या सभेत नगरपालिकेचे शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपाध्यक्ष अब्दुल  माबुद बागवान, मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. हिंगोली शहरामध्ये मोकाट  जनावरांचा वावर व भटक्या कुत्र्याविषयी चिंतेची बाब होती. त्या  अनुषंगाने सर्व साधारण  सभेत हिंगोली  शहरातील भटक्या कुत्र्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार  कायमस्वरुपी निवारा केंद्राची व्यवस्था, तसेच हिंगोली शहरातील मोकाट जनावंरासाठी जागा निश्चिीती करून कोंडवाडा उभारणी,  हिंगोली नगरपरिषद  मजुर  विकास योजनेतील आरक्षण क्रमांक ३३ मध्ये भाजी बाजार आणि व्यापारी संकुल विकसीत  करणे.

हिंगोली  शहरातील विविध प्रभागात अखिव पत्रिका उपलब्ध  नसलेल्या क्षेत्रासाठी  भु-नक्क्षा अंतर्गत मिळकतीची भुमीअभिलेख   विभागाकडून  मोजणी  करणे, हिंगोली नगर परिषदेच्या इमारतीत लिप्टची सुविधा करणे यासह एकूण १६ विषयावर चर्चा झाली. हे सर्व ठराव एकमताने पारीत करण्यात आले. या सभेत काही प्रभागात स्विकृत सदस्य विकास कामामध्ये हस्तक्षेप करीत असल्याचा मुद्दा नगरसेवक नाना  नायक यांनी उपस्थित  केला.