Hingoli Student Death

हिंगोलीच्या 25 वर्षीय विद्यार्थ्याचा जपानमध्ये पोहताना मृत्यू; IIT खरगपूरकडून गेला होता प्रशिक्षणासाठी

हिंगोलीतील 25 वर्षीय तरुण विद्यार्थ्याचा जपानमध्ये पोहताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

हिंगोलीच्या 25 वर्षीय विद्यार्थ्याचा जपानमध्ये पोहताना मृत्यू; IIT खरगपूरकडून गेला होता प्रशिक्षणासाठी

Hingoli Student Death

हिरोशिमा विद्यापीठात सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड; पुढील आठवड्यात पार्थिव महाराष्ट्रात आणणार

हिंगोलीतील 25 वर्षीय तरुण विद्यार्थ्याचा जपानमध्ये पोहताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. श्याम संतोष अग्रवाल असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या निधनाची माहिती कुटुंबीयांना संदेशाद्वारे मिळाली. या घटनेने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हिंगोली जिल्ह्यातही हळहळ व्यक्त होत आहे.

श्याम हा IIT खरगपूरमध्ये ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’चे शिक्षण घेत होता. ‘IIT एक्सचेंज’ कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयाकडून सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली होती. या प्रशिक्षणासाठी तो गेल्याच महिन्यात जपानमधील हिरोशिमा विद्यापीठात दाखल झाला होता.

दरम्यान, जपानमधील कुरे शहरात असलेल्या ‘कारुगा बीच पार्क’ येथील स्विमिंग पूलमध्ये श्याम पोहण्यासाठी गेला होता. पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यानंतर बराच वेळ उलटूनही तो बाहेर न आल्याने जीवरक्षकांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी श्यामचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

पुढील आठवड्यात पार्थिव महाराष्ट्रात आणणार

श्यामचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. उपलब्ध माहितीनुसार, पुढील आठवड्याभरात त्याचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथे आणले जाणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित सामग्री

जपानमधील कुरे शहरात पोहताना बुडून हिंगोलीच्या तरुणाचा मृत्यू शहरावर शोककळा

जपानमधील कुरे शहरात पोहताना बुडून हिंगोलीच्या तरुणाचा मृत्यू शहरावर शोककळा

Hingoli Youth Death: जपानच्या कुरे शहरातील कारुगा बीच पार्क येथे पोहण्यासाठी गेलेल्या हिंगोलीच्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे. शाम संतोष अग्रवाल (वय २५) असे मृत तरुणाचे नाव

Sep 01, 2026
नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी लातूरमध्ये मनसेची निदर्शने

नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी लातूरमध्ये मनसेची निदर्शने

NEET exam scam: नीट पेपर घोटाळ्यातील आरोपी आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांचा विरोध करून लातूरमध्ये मनसेचे निदर्शने झाले.

May 19, 2026
कुटुंबाला आधीच मेसेज… आणि मग टोकाचा निर्णय; खरगपूरमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्त्या

कुटुंबाला आधीच मेसेज… आणि मग टोकाचा निर्णय; खरगपूरमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्त्या

IIT खरगपूर येथील चौथ्या वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याने कुटुंबाला पाठवलेल्या धक्कादायक आणि पूर्वनियोजित मेसेजनंतर त्याचा हॉस्टेल रूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

Apr 30, 2026