हिंगोली (Hingoli Student Surgery) : येथील महादेव माळीराम स्मारक प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी साई सखाराम पाटोळे यांच्या अन्ननलिकेवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली आहे. सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून संस्थेच्यावतीने आणि शाळेतील शिक्षकवृंदांनी त्याच्या वैद्यकीय उपचारार्थ हातभार लागावा म्हणून एकूण ₹१४,१००/- अर्थसाह्य केले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.जे.एम. मंत्री यांनी सुध्दा सदरील विद्यार्थ्यास आर्थिक मदत करून करून सहकार्य केले.
स्वातंत्र्यदिनी झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे सहसचिव जयकुमार संघई, विश्वस्त Adv. किरण नर्सीकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती सताळकर यांच्याहस्ते शालेय गणवेशासह शाळेतील शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सदरील अर्थसाह्य वाटप करण्यात आले. (Hingoli Student Surgery) विद्यार्थी साई याच्यावर झालेल्या उपचारानंतर तो लवकरात लवकर पूर्णपणे निरोगी होऊन शैक्षणिक प्रवाहात पूर्ववत उत्साहाने सहभागी व्हावा, यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व ट्रस्टच्या वतीने त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. “विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी!”
हिंगोली विद्यार्थी शस्त्रक्रिया
विद्यार्थ्याच्या उपचारासाठी शाळेचा मदतीचा हात..
Hingoli Student Surgery: सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून संस्थेच्यावतीने आणि शाळेतील शिक्षकवृंदांनी त्याच्या वैद्यकीय उपचारार्थ हातभार लागावा म्हणून एकूण ₹१४,१००/- अर्थसाह्य केले.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hingoli Student Surgery