हिंगोली व्यापारी प्राणघातक हल्ला

उधारी आणि गणपती वर्गणीच्या कारणावरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Hingoli Trader Attack: वाळूमाफिया प्रवृत्तीच्या गावगुंडांनी एका व्यापारी तरुणासह त्याच्या भावावर कटर, लोखंडी रॉड, काठ्या आणि केबलने प्राणघातक हल्ला केल्याची घटना

उधारी आणि गणपती वर्गणीच्या कारणावरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Hingoli Trader Attack

 

नऊ जणांविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली (Hingoli Trader Attack) : खत-बियाणे उधारीवर का देत नाही आणि गणपती वर्गणी का दिली नाही. या कारणावरून वाळूमाफिया प्रवृत्तीच्या गावगुंडांनी एका व्यापारी तरुणासह त्याच्या भावावर कटर, लोखंडी रॉड, काठ्या आणि केबलने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सेनगाव तहसील टी-पॉईंट परिसरात घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, हा प्रकार दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास तहसील टी-पॉईंट येथील पाटील कृषी सेवा केंद्र अँड मशिनरी दुकानासमोरील रस्त्यावर घडला. फिर्यादी भागवत वामन दाहीरे रा. इंदिरानगर, सेनगाव) आणि त्यांचा भाऊ शुभम यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात दोघांच्या डोके, पोट, हात, पाठ व कानावर मार लागून ते जखमी झाले. तसेच शिवीगाळ, थापड-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या (Hingoli Trader Attack) प्रकरणी फिर्यादीच्या एमएलसी जबाबावरून  २० सप्टेंबर रोजी रात्री १२.३१ वाजता भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी *सुरज कैलास देशमुख, गोपाल अनिलराव देशमुख, करण भिमराव देशमुख, राजू उर्फ माणिक तातेराव देशमुख, अकुश उर्फ बबलू शंकरराव देशमुख, जीवन अनिलराव देशमुख, नितीन विष्णू देशमुख, प्रशांत गजानन देशमुख, विलास देशमुख (सर्व रा. सेनगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून त्यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, पोलीस उपनिरीक्षक शेट्टीवार यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविकिरण खंदारे करीत आहेत.

टैग्स: Hingoli Trader Attack