हिंगोली (Hingoli District Hospital) : राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा संचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण (मुंबई) यांचे आयुक्त संजय काटकर यांनी हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील ओपीडी, आयपीडी, जनरल विभाग, एमआरआय विभाग, अती दक्षता नवजात बालक विभाग, प्रयोगशाळा, एक्स-रे विभाग, औषध साठा, प्रसूती कक्ष, माता-बाल संगोपन सुविधा, ऑपरेशन थिएटर आदी विभागांची पाहणी करून आरोग्य सेवेचा सविस्तर आढावा घेतला. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून उपलब्ध आरोग्य सेवांबाबत माहिती घेतली असता नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आयुक्त संजय काटकर यांनी आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या त्या पूर्ण सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (Hingoli District Hospital) जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम बनण्यास मदत होईल अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिपक मोरे, बालरोग तज्ञ गोपाल कदम, डॉ. विशाल पवार आणि रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हिंगोली जिल्हा रुग्णालय
आयुक्त संजय काटकर यांच्याकडून हिंगोली जिल्हा रुग्णालयाची पाहणी
Hingoli District Hospit: रुग्णालयातील ओपीडी, आयपीडी, जनरल विभाग, एमआरआय विभाग, अती दक्षता नवजात बालक विभाग, प्रयोगशाळा, एक्स-रे विभाग, औषध साठा, प्रसूती कक्ष, माता-बाल संगोपन सुविधा, ऑपरेशन थिएटर आदी
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hingoli District Hospital
टैग्स:
Hingoli district hospital inspection
health services improvement
Maharashtra government health visit
Ayushman Katskar review
community healthcare updates
संबंधित सामग्री
एनक्यूएएस नामांकनाच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयास भेट
Govt Medical College: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयास भेट देऊन त्यांनी विविध विभागांची पाहणी केली आणि सुविधा सुधारण्यासाठी सूचना दिल्या.
May 08, 2026