राष्ट्रीय मानवाधिकार संघटना

माणुसकीचा आदर्श..घोट येथील मनोरुग्ण सुनील रंगारी यांचा नवीन वस्त्र व पादत्राण देऊन सत्कार

National Human Rights Organization: घोट येथील सुनील केशव रंगारी या मनोरुग्ण व्यक्तीचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने नवीन वस्त्र व पादत्राण भेट देऊन सन्मान करण्यात आला.

माणुसकीचा आदर्श..घोट येथील मनोरुग्ण सुनील रंगारी यांचा नवीन वस्त्र व पादत्राण देऊन सत्कार

National Human Rights Organization

घोट (National Human Rights Organization) : घोट येथील सुनील केशव रंगारी या मनोरुग्ण व्यक्तीचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने नवीन वस्त्र व पादत्राण भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्यासाठी हॉटेल उपाध्ये येथे जेवणाची कायमस्वरूपी व्यवस्था करून माणुसकीचा आदर्श घालून देण्यात आला. सुनील रंगारी हे घोट परिसरात निःस्वार्थपणे रस्ते,परिसर,घोटगावाची साफसफाई करत असतात. कोणाकडून मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ते सेवा देत असून, कुणी अन्न दिले तरी आनंदाने स्वीकारतात आणि नाही दिले तरी कोणतीही तक्रार करत नाहीत. खाकी पोशाख परिधान करून अनेकांना "जय हिंद" म्हणत सॅल्यूट करणारे सुनील रंगारी संपूर्ण पंचक्रोशीत परिचित आहेत.

त्यांच्या या सेवाभावी वृत्तीची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सुनील रंगारी यांची भेट घेऊन त्यांना नवीन कपडे, पादत्राणे भेट दिली. तसेच त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून समाजासमोर संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला.

यावेळी डॉ. प्रणय खुणे म्हणाले की,समाजात अनेकजण निःस्वार्थपणे कार्य करत असतात; मात्र त्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.अशा गरजू व्यक्तींना पैशांपेक्षा अन्न, पाणी आणि मायेची गरज असते. प्रत्येकाने आपल्या परीने अशा व्यक्तींना मदतीचा हात दिल्यास त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो.या कार्यक्रमाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानुभाऊ उपाध्ये, भाजप घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार, आदिवासी आघाडी अध्यक्ष विलास उईके,भोजराज रामटेके,राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे नेते महेश विश्वास,तालुका सचिव दिनेश मुजुमदार तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित सामग्री

दशनाम गोसावी समाजाचा २ ऑगस्टला लातूरमध्ये 'पंचसूत्री' सोहळा

दशनाम गोसावी समाजाचा २ ऑगस्टला लातूरमध्ये 'पंचसूत्री' सोहळा

Dashnam Gosavi Samaj: दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकास

Jul 28, 2026
आ. राजू नवघरे यांच्या हस्ते कुरुंद्यात ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न

आ. राजू नवघरे यांच्या हस्ते कुरुंद्यात ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा संपन्न

MLA Raju Navghare: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व, अजित पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताह आयोजित केलेल्या  विविध कार्यक्रमाचे उद्घाटक  आ. राजू नवघरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Jul 27, 2026
कुंभारझरी येथील ‘वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान’ला ‘निर्मल वारी आदर्श दिंडी’ पुरस्कार प्रदान

कुंभारझरी येथील ‘वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान’ला ‘निर्मल वारी आदर्श दिंडी’ पुरस्कार प्रदान

Nirmal Wari Adarsha Dindi Award: कुंभारझरी ‘वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित स्वग्राम ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास निर्मल वारी आदर्श दिंडी पुरस्कार २०२६ जाहीर

Jul 27, 2026
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात; ४५ रक्तदात्यांचा सहभाग

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात; ४५ रक्तदात्यांचा सहभाग

Chikhali Blood Donation: जुने गाव येथे निलकमल गणेश मंडळ व आई तुळजाभवानी मित्र मंडळच्या संयुक्त प्रयासात आयोजित रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने दान केले. रक्तदान समाज सर्वश्रेष्ठ दान

Jun 09, 2026
परभणीत मृत्यूनंतर शेतात अस्थी विसर्जन करत लावले आंब्याचे झाड!

परभणीत मृत्यूनंतर शेतात अस्थी विसर्जन करत लावले आंब्याचे झाड!

Shetkari Bones Immersed: रामभाऊ थिटे यांच्या अंत्यसंस्कारानंतर, कुटुंब पालकसेवा आणि पर्यावरण संवर्धनाची इच्छा पालन करून आंब्याचे झाड लावून अस्थी विसर्जन केले.

May 26, 2026