हिंगोली (Illegal Businesses Campaign) : नांदेड परिक्षेत्रात पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३० सप्टेंबर दरम्यान अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-३ राबवली जात आहे. या मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे १ ते ७ सप्टेंबर दरम्यान परिक्षेत्रात एकूण ३४१ गुन्हे दाखल करून ५ कोटी ६३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परिक्षेत्रात नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. यात गुटखा विक्रीचे ८, मटका जुगाराचे ५७, अवैध दारू विक्रीचे २१३, शस्त्र अधिनियमाचे १० आणि इतर ५३ गुन्ह्यांचा समावेश आहे.
मात्र या आकडेवारीत हिंगोली जिल्हा पोलिसांची कामगिरी विशेषतः शस्त्र अधिनियमात अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण परिक्षेत्रात शस्त्र अधिनियमाखाली १० गुन्हे दाखल झाले असताना हिंगोली जिल्ह्यात केवळ एकमेव गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यात केवळ ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त दाखवण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.तुलनेत परभणी जिल्ह्यात शस्त्र अधिनियमाचे ४ गुन्हे दाखल होऊन ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला आहे, लातूरमध्ये ३ गुन्हे आणि नांदेडमध्ये २ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे हिंगोलीत सर्वात कमी कारवाई झाल्याचे स्पष्ट होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात गुटख्याचा १, मटका जुगाराचे १४, दारूचे ६४ आणि इतर १६ असे एकूण ९६ गुन्हे दाखल झाले आहेत. दारू आणि मटक्यावर मोठ्या प्रमाणात कारवाया दाखवणार्या हिंगोली पोलिसांना अवैध शस्त्र बाळगणारे सापडत कसे नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवैध शस्त्रांमुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांची ही कारवाई केवळ नावापुरती असल्याची टीका होत आहे.
अवैध व्यवसाय निर्मुलन मोहिम
अवैध व्यवसाय निर्मुलन मोहिमेत जिल्ह्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत एकमेव गुन्हा दाखल
Illegal Businesses Campaign: नांदेड परिक्षेत्रात पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३० सप्टेंबर दरम्यान अवैध व्यवसाय निर्मूलन मोहीम-३ राबवली जात आहे.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Illegal Businesses Campaign
टैग्स:
Illegal Businesses Campaign
संबंधित सामग्री
'अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-2': आकडेवारीत हिंगोली पिछाडीवर, मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह
Illegal Businesses Campaign: नांदेड परिक्षेत्रात 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविलेल्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम-2 अंतर्गत हिंगोली जिल्हा पोलिसांची कामगिरी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत..
Aug 17, 2026