कळमनुरी (Illegal firecracker stockpile) : हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे. कळमनुरी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी प्रशासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारे फटाक्यांचा साठा व विक्री बाजारपेठ, मानवी वसाहत असणारी ठिकाणे आणि अरुंद रस्ते असणार्या ठिकाणी करू नये.
तसेच आपल्या घरात किंवा दुकानात कोणत्याही प्रकारे फटाक्यांचा अवैध साठा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हिंगोली शहरात घडलेली घटना कळमनुरी शहरात घडू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक मयूर रसाळ यांनी केले आहे.
फटाका अवैध साठा
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्यांना आवाहन
Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Illegal firecracker stockpile