हिंगोली (Hingoli Gambling Raids) : जिल्ह्यातील गोरेगाव व संतुक पिंपरी येथे सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा व गोरेगाव पोलिसांनी छापे मारून गुन्हे दाखल केले. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने जिल्ह्यातील १३ ही पोलिस ठाण्यातील अधिकारी अवैध धंद्यावर कारवाई करीत आहेत. गोरेगाव येथील गौरी नगर भागात ११ ऑगस्टला सायंकाळी ५.१० च्या सुमारास सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर गोरेगाव पोलिसांनी छापा मारून नगदी १४५० रुपये जप्त केले. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात राहुल मैदकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय आनंदराव केळे, मुक्तार शेख खाजा शेख, महेबुब सय्यद युसूफ सय्यद, कलिम सय्यद सलिम सय्यद, समदखान मस्जिदखान पठाण सर्व रा. गोरेगाव या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राहुल मैदकर हे करीत आहेत.
त्याच प्रमाणे संतुक पिंपरी येथे सोलार प्लँटच्या बाजूला सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ ऑगस्टला छापा मारला. ज्यामध्ये मोटार सायकल क्रमांक एमएच ३८ एबी ५३२२ व दोन मोबाईल यासह रोख रक्कम असा एकुण ६१ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात स्थानिक गुन्हे शाखेचे संदिप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश आनंदराव दिपके रा. संतुक पिंपरी, प्रकाश ग्यानबा मुकाडे या दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास असलम गारवे हे करीत आहेत. विशेष म्हणजे संतुक पिंपरी शिवारात फौजी बारच्या बाजूला ७ ऑगस्टला याच पथकाने झन्ना मन्ना जुगारावर छापा मारून १ लाख ८६ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला होता.
Hingoli Gambling Raids
गोरेगाव व संतुक पिंपरी येथे झन्ना मन्ना जुगारावर छापे
Hingoli Gambling Raids: जिल्ह्यातील गोरेगाव व संतुक पिंपरी येथे सुरू असलेल्या झन्ना मन्ना जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा व गोरेगाव पोलिसांनी छापे मारून गुन्हे दाखल केले.
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hingoli Gambling Raids