शिरडशहापूर अवैध रेती

शिरडशहापूर बसस्थानकाजवळ पकडले अवैध रेतीचे ट्रॅक्टर

Shiradshahapur Illegal sand:

शिरडशहापूर बसस्थानकाजवळ पकडले अवैध रेतीचे ट्रॅक्टर

Shiradshahapur Illegal sand

औंढा नागनाथ (Shiradshahapur Illegal sand) : तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाने ६ सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील बसस्थानकाच्या जवळ अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडले. ६ लाख ५ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून  ट्रॅक्टर चालक- मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 रविवारी मिळालेल्या गुप्त माहितीवरून तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी अर्चना पटवे, सुजाता गायकवाड, तलाठी केशव जगताप, सुरेश दुबे, बांगर, मुंडे यांच्या पथकाने कारवाई केली व ट्रॅक्टर वाहन औंढा नागनाथ पोलीस ठाणे येथे आणून लावण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस कॉन्स्टेबल ओंकारेश्वर रांजणेकर यांनी पंचनामा केला.

मंडळ अधिकारी सुजाता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक पवन सुरेश खूणे राहणार नालेगाव, नितीन उर्फ पिंटू प्रल्हाद खेबाळे रा. शिरड शहापूर यांच्यावर ६ सप्टेंबर रोजी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shiradshahapur Illegal sand) गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस करत आहेत.

संबंधित सामग्री

पाणी बचतीचे नियम शेतकऱ्यांसाठीच का?; खडकपूर्णा प्रकल्पातील अवैध रेती उपशाच्या बोटी बंद करा!

पाणी बचतीचे नियम शेतकऱ्यांसाठीच का?; खडकपूर्णा प्रकल्पातील अवैध रेती उपशाच्या बोटी बंद करा!

Khadakpurna Project Illegal sand dumping: जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना खडकपूर्णा प्रकल्पातील पाण्याच्या वापराबाबत प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत.

Oct 06, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026
अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; ७.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; ७.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal sand transportation: तालुक्यातील इंद्राळ येथे विनापरवाना वाळू उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर देवणी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर व ट्रॉलीतील अंदाजे एक ब्रास वाळू

Sep 28, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

निलंगा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह ७०० ब्रास वाळू आणि ४५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Sep 22, 2026
वाळू साठा जप्त, कोणाचा ते कळेना!

वाळू साठा जप्त, कोणाचा ते कळेना!

Latur illegal sand: अवैध वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेने घणाघात करीत औराद परिसरात तेरणा नदीलगतच्या शेतातून तब्बल ५ लाखांची (१०० ब्रास) वाळू जप्त केली. गुरुवारी दुपारी आणि गुन्हे शाखा

Sep 11, 2026