बंदोबस्त असतानाही पुतळा बसेपर्यंत पोलिसांनाही नव्हता पत्ता
वसमत (API Ramdas Nirdode) : ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांच्यावर मुख्यालयी अटॅच करण्याची तडका फडकी कारवाई पोलीस अधीक्षकांनी केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे इंजनगाव येथे दोन समाजात तेढ निर्माण होण्याचा प्रसंग असताना, पोलीस बंदोबस्त असतानाही पुतळा बसवेपर्यंत गाफील राहणे त्यांच्या अंगलट आले आहे कर्मचार्यांऐवजी थेट ठाणे प्रमुखावर कारवाई करण्याचा दणका पोलीस अधीक्षकांनी दिल्याने हा सर्व ठाणे प्रमुखांना इशारा समजल्या जात आहे.
वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नव्यानेच रूजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे (API Ramdas Nirdode) यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कळमनुरी येथील सपोनी उमाकांत पुणे यांची नेमणूक करण्यात करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी केली आहे.
वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे दोन समाजात जागेवरून जुना वाद आहे दरवर्षी त्यातून तणाव निर्माण होतो हे माहीत असताना ठाणेदार या नात्याने कोणत्याही उपाय योजना करण्यात आल्या नाहीत त्यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी झेंडा लावण्याची घटना घडल्याने दोन समाजात तणाव निर्माण झाला होता त्यावेळी पोलीस अधीक्षक व महसूल विभागाच्या अधिकार्यांनी गावात येऊन वादावर पडदा टाकला होता या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून वादग्रस्त जागे शेजारी पोलीस बंदोबस्त व पोलीस चौकी तैनात करण्यात आली होती ठाणेदार व बंदोबस्तावरील पोलीस कर्मचार्यांनी मागील इतिहास व घडलेली घटना पाहता सतर्क राहण्याची गरज होती मात्र तसे घडले नाही ठाणेदार गाफील राहिले 'शांतता आहे संदेश नाही'असे अधिकार्यांना भासवण्याचा प्रकार झाला.
आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला पोलीस चौकी असतानाही वादग्रस्त जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचा प्रकार घडला अचानक पुतळा बसवण्यात आल्याने पुन्हा दोन समाजात तणाव निर्माण झाला होता पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, यांना पुन्हा मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन इंजनगावात यावे लागले पोलीस अधिकारी महसूल अधिकारी यांनी पुन्हा दोन्ही समाजाला एकत्र बसवून समजावून सांगितले होते व तात्पुरता बसवलेला पुतळा वादग्रस्त जागेवरून काढून समाज मंदिरात हलवण्यात यश मिळवले व बाका प्रसंग टळला या प्रकाराने पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा हे चांगलेच संतापले होते.
दोन समाजात तणाव असताना व पोलीस बंदोबस्त असताना वादग्रस्त जागेवर पुतळा बसेपर्यंत पोलिसांना समजले कसे नाही हा खरा सवाल होता, (API Ramdas Nirdode) ठाणेदार रामदास निरदोडे यांच्या निष्काळजीपणातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले अखेर पोलीस अधीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांना मुख्यालयात संलग्न करण्याचे आदेश काढले. कर्मचार्यांवर कारवाई करण्याऐवजी ठाणे प्रमुखांना जबाबदार धरून ठाणे प्रमुखावर कारवाई करण्याचे अस्त्र पोलीस अधीक्षकांनी वापरल्याने पोलीस अधिकार्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
गंभीर प्रकरणात बेफिकीर राहणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांना महागात पडल्याचे दिसत असले तरी या प्रकरणासोबत इतर अनेक प्रकरणाचा आढावा पोलीस अधीक्षकांनी घेऊन ही कारवाई केली असल्याचे समोर येत आहे त्यांच्या जागेवर कळमनुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमांकात पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुणे यांनी वसमत ग्रामीण ठाण्यात पदभार स्वीकारला आहे पोलीस अधीक्षकांनी केलेली कारवाई हा सर्व ठाणे प्रमुखांना इशारा असल्याचेही समजले जात आहे पोलीस अधिकार्यांना अंधारात ठेवून टेक्निकल कारवाया करून 'शांतता आहे संदेश नाही'असे भासवणे जमणार नाही असेच यावरून दिसत आहे.
टेक्निकल कारवायांचा हिशोब करण्याची गरज : ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ दिवसापूर्वी एलसीबी पथकाने राशनचा गहू आहे या संशयावरून गव्हाचा ट्रक माळवटा शिवारात पकडला होता व ग्रामीण पोलीस ठाणे येथे आणून लावला होता प्रदीर्घ कालावधीनंतर धान्याचा काळाबाजार प्रकरणावर कारवाई झाली असे वाटत होते मात्र एलसीबीची कारवाई क्षणिक ठरली नेहमीप्रमाणे पुरवठा विभागाने हा गहू राशनचा नसल्याचा अहवाल दिला हे कारण दाखवून पकडलेला धान्याचा ट्रक सोडून द्यावा लागला गव्हाचा ट्रक पकडताना नेमका काय संशय आला होता, व्यापार्याची गाडी होती तर गाडी सोबत कागदपत्रे का तपासल्या गेली नाही.
पोलीस ठाण्यापर्यंत गाडी का आणली गेली हे मात्र समजू शकले नाही अशाघटनांची ही सखोल चौकशी करून पोलिसांची गफलात नेमकी कोठे झाली याची चौकशी होण्याची गरज आहे. टेक्निकल कारवायामुळे अवैध व्यवसायाला बळ मिळत आहे हे लपून राहिले नाही पोलीस अधीक्षकांनी टेक्निकल कारवायांचा हिशोब करून ज्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध व्यवसाय आढळले त्या ठाणे प्रमुखांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली तरच अवैध व्यवसायाला व गैरप्रकाराला आळा बसेल अन्यथा कारवाया सुरू व अवैध व्यवसाय सुरू हा मागील प्रकार पुढे सुरू राहील यात शंका नाही.