मानोरा आत्मदहन आंदोलन

पालकमंत्री जिल्ह्यात असतानाही प्रशासन बेपत्ता; अखेर तुर्तास आत्मदहन आंदोलन मागे!

Manora Immolation Protest: तालुक्यातील मौजे भुली येथील शेकडो नागरिक सन २०२३ पासून अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत , पात्र कुटुंबांना न्याय मिळावा आणि दोषीविरुद्ध कार्यवाही करावी,

पालकमंत्री जिल्ह्यात असतानाही प्रशासन बेपत्ता; अखेर तुर्तास आत्मदहन आंदोलन मागे!

Manora Immolation Protest

मानोरा (Manora Immolation Protest) : तालुक्यातील मौजे भुली येथील शेकडो नागरिक सन २०२३ पासून अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत , पात्र कुटुंबांना न्याय मिळावा आणि दोषीविरुद्ध कार्यवाही करावी, यासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने देवानंद शिंदे आणि राजेश राठोड यांनी स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र या दिवशी अधिकारी अनुपस्थित राहिले. शेवटी ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मध्यस्थीने आपदग्रस्त नागरिकांनी आंदोलन तुर्तास स्थगित केले आहे. 

दोषी अधिकारी व कर्मचारी, यांच्यावर शासन नियमानुसार कार्यवाही व्हावी व आपदग्रस्त नागरिकांना अतिवृष्टीचा लाभ मिळावा यासाठी मागील २ वर्षापासून नागरिक लढा देत आहेत. विशेष म्हणजे, दिनांक २ऑगस्ट २०२६ रोजी महसूल दिनानिमित्त आयोजित “महाराजस्व समाधान शिबिरात” नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. आत्मदहनाचा इशाराही देऊन तब्बल १५ दिवस अगोदर प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र निवेदन देऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

त्याहून गंभीर बाब म्हणजे, पालकमंत्री वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानासुद्धा आत्मदहनाच्या ठिकाणी एकही संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी आला नाही. तेव्हा जनतेच्या जीविताचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना प्रशासनाची ही उदासीनता अत्यंत संतापजनक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सामान्य जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

सन २०२३ अतिवृष्टी अनुदानापासून वंचित असलेल्या पात्र कुटुंबाची तातडीने पडताळणी करून नियमानुसार अनुदानाचा लाभ द्यावा, करण्यात आलेल्या चौकशीतील निष्कर्ष जनतेसमोर स्पष्ट करावेत, तसेच सबंधित दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यावर कार्यवाही करून न्याय मिळाला नाहीतर आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलक शिंदे व राठोड यांनी दिला असल्याची माहिती दिली.

संबंधित सामग्री

'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

'मंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?'

CJP Abhijit Deepke: जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरावस्था पाहून संताप व्यक्त करत कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी शासन- प्रशासनाला थेट इशारा दिला आहे.

Aug 19, 2026
&quotमंत्री-प्रशासनाची मुले बाकावर, आमची मुले जमिनीवर का?&quot

भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेला; जलसंधारण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेला; जलसंधारण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरची तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या भर्रीटोला-नवरगाव मार्गावरील पूलवजा बंधारा वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

Aug 13, 2026
खोटे आरोप करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपाने आता देशाची माफी मागावी!

खोटे आरोप करून सत्ता मिळवणाऱ्या भाजपाने आता देशाची माफी मागावी!

Congress Abhay Salunkhe: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लातूर जिल्हाधिकारी अभय साळुंके यांनी भाजपांना खोटे आरोपांच्या बाबतीत देशाची माफी मागावी म्हणून मागणी केली आहे.

Aug 09, 2026
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी यवतमाळमध्ये मोर्चा

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी यवतमाळमध्ये मोर्चा

Students Yavatmal March: विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा सरकारने राजीनामा घेतला. मात्र, यामुळे समस्या सुटणार नाही. सरकारने शैक्षणिक धोरणांत सुधारणा करावी

Jul 26, 2026