कंत्राटदाराच्या निष्काळजीपणा

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान; भरपाईच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा

Kalamnuri Contractor's negligence: कळमनुरी नगरपरिषदेच्या वतीने सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाली बांधकामातील गंभीर हलगर्जीपणामुळे रघुकुल कॉम्प्लेक्स व परिसरातील व्यापाऱ्यांचे दुकानात पाणी

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान; भरपाईच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा

Kalamnuri Contractor's negligence

कळमनुरी (Kalamnuri Contractor's negligence) : कळमनुरी नगरपरिषदेच्या वतीने सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या नाली बांधकामातील गंभीर हलगर्जीपणामुळे रघुकुल कॉम्प्लेक्स व परिसरातील व्यापाऱ्यांचे दुकानात पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. या घटनेमुळे संतप्त व्यापाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली असून, प्रशासनाने दाखल ना घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांनी निवेदन द्वारे दिला आहे.

कळमनुरी शहरातील शपदरी रस्त्या लगत पावसाळ्यापूर्वी नालीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असलेले नालीचे काम ऐन पावसाळ्यातही संथ गतीने सुरू आहे. २७ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात बसस्थानक ते जुने बसस्थानक दरम्यान रघुकुल कॉम्प्लेक्स  समोरील नालीचे काम सुरू असताना कंत्राटदाराने पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचऱ्याचा मार्ग बंद केल्याने संपूर्ण पाणी थेट दुकानांमध्ये शिरले.

या (Kalamnuri Contractor's negligence) घटनेत कृषी केंद्रे, हार्डवेअर, मशिनरी, ऑप्टिकल, फोटो स्टुडिओ, इलेक्ट्रिकल्स, मेन्स पार्लर तसेच इतर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून खते, बियाणे, शेती औषधे, मशिनरी, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक व्यापाऱ्यांनी बँकांचे कर्ज घेऊन व्यवसाय उभारला असून या नुकसानीमुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. व्यापाऱ्यांनी ही घटना नैसर्गिक नसून कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे घडलेली मानवनिर्मित आपत्ती असल्याचा आरोप केला आहे. "नैसर्गिक पाण्याचा मार्ग अडवला नसता तर पाणी दुकानांत शिरलेच नसते," असा संतप्त आरोप व्यापाऱ्यांनी केला.

व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेकडे तातडीने पंचनामा करून शंभर टक्के नुकसानभरपाई देणे, संबंधित कंत्राटदाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करणे आणि भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे, या प्रमुख मागण्या केल्या आहेत. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने न्याय न दिल्यास सर्व बाधित व्यापारी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडणार असून, संबंधित कंत्राटदार व प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, नगरपरिषद प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे व्यापाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईच्या ३४% पाण्याची गळती-चोरीत नासाडी; गारगाई धरणाएवढ्या तीन धरणांचे पाणी वाया

मुंबईत रोज १,३९० दशलक्ष लिटरहून अधिक पाणी गळती, चोरी आणि अनधिकृत वापरामुळे वाया जाते. गारगाईसारख्या तीन धरणांच्या क्षमतेइतकी ही नासाडी आहे.

Oct 03, 2026
मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; 2 जणांचा मृत्यू? 7 ते 8 कामगार जखमी

मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली; 2 जणांचा मृत्यू? 7 ते 8 कामगार जखमी

मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असून जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य सुरू आहे.

Sep 21, 2026
लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

लातूर जि. प. ची लक्तरे टांगली वेशीवर!

Latur Zilla Parishad: 'स्वच्छ भारत मिशन' जिल्हाभरात राबविणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेत सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. लिफ्ट महिनोंमहिने बंद आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य

Sep 01, 2026
कुरुंदा येथे इमारतीवरून पडून तरुण कामगाराचा मृत्यू

कुरुंदा येथे इमारतीवरून पडून तरुण कामगाराचा मृत्यू

Young Worker Death: कुरुंदा येथे टॉवरचे काम सुरु असताना इमारतीवरून तोल जाऊन खाली पडल्याने एका तरुण कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली.

Aug 23, 2026
घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

घाणीच्या ठिकाणी चिखली नगराध्यक्षांचा २ तास ठिय्या; ‘स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’साठी थेट पुढाकार

Chikhali Mayor Andolan: स्वच्छ चिखली, सुंदर चिखली’चा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी रविवारी (२३ ऑगस्ट) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

Aug 23, 2026