कळमनुरी (Illegal sand transportation) : तालुक्यातील नांदापूर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कळमनुरी पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. २१ जून रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास मौजे नांदापूर येथील रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तत्काळ छापा टाकून कारवाई केली. या कारवाईदरम्यान संतोष गुलाबराव खराटे (वय ३२, रा. म्हैसगव्हाण, ता. कळमनुरी) हा विना परवाना व विना क्रमांकाच्या स्वराज ७४४ एफई ट्रॅक्टर व ट्रॉलीद्वारे अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली.
जप्त करण्यात आलेल्या (Illegal sand transportation) मुद्देमालामध्ये ५ लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर हेड, १ लाख ५० हजार रुपये किंमतीची ट्रॉली आणि ६ हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू असा एकूण ६ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई शेख रहीमोद्दीन शरीफोद्दीन यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सांगळे करीत आहेत.
कळमनुरी पोलीसांकडून अवैध वाळू उत्खनन (Illegal sand transportation) व वाहतुकीविरोधात सातत्याने कारवाई सुरू असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी दिला आहे.
नांदापूर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त; ६ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Illegal sand transportation: नांदापूरच्या रेल्वे स्टेशन जवळ एक त्रकालिक कारवाईमध्ये कळमनुरी पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींचा ट्रॅक्टर जप्त केला.
Illegal sand transportation
संबंधित सामग्री
रेतीची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; २४.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Illegal sand transportation: सेनगावात मध्यरात्री धडका करण्यात आली, दोन टिप्परांमध्ये एकूण २४.२४ लाखांचा रेतीचा मुद्देमाल जप्त झाला; आरोपी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल होईल.
कळमनुरी पोलिसांची वाळूमाफियांवर सलग दुसर्या दिवशीही कारवाई; वाळूमाफ्यांचे धाबे दणाणले
Kalamnuri sand mafia: कळमनुरी पोलिसने अवैध वाळू वाहतुकीवर दुसरा दिवसात मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका ट्रॅक्टरमधून ५.२६ लाख रुपयांचे माल जप्त केले.