विद्युत तारेचा करंट

कांद्रीत ११ वर्षीय मुलाला ११ हजार व्होल्ट विद्युत तारेचा करंट

Electric wire current: कांद्रीत ११ वर्षीय मुलाला ११ हजार व्होल्ट विद्युत तारेचा करंट लागून गंभीर जखमी झाला, परंतु स्थानिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.

कांद्रीत ११ वर्षीय मुलाला ११ हजार व्होल्ट विद्युत तारेचा करंट

Electric wire current

 

नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच उपचार मिळाल्याने मुलाचा जीव थोडक्यात वाचला 

महावितरण व नगरपंचायत प्रशासना विरोधात नागरिकांचा संताप

कन्हान (Electric wire current) : कांद्री नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्र. ६ येथिल वेकोलिच्या मागिल परिसरात घडलेल्या धक्का दायक घटनेत ११ वर्षीय मुलाला ११ हजार व्होल्टेज विद्युत तारेचा करंट लागुन तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच उप चार मिळाल्याने मुलाचा जीव वाचला असुन त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. या घटने नंतर परिसरातील नागरिकांनी महावितरण विभाग आणि नगरपंचायत प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त करत निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
             
प्राप्त माहितीनुसार, सोमवार (दि.११) मे ला दुपारी १२ वाजता दरम्यान नितीन नरेंद्र सूर्यवंशी हा आपल्या चुलत भाऊ अंकित बिरन सूर्यवंशी आणि अजित श्याम सूर्यवंशी सोबत खेळत होते. खेळता-खेळता नितीन सूर्यवंशी चा हात अचानक खाली झुकलेल्या विद्युत तारेस लागला आणि तो तारेला चिकट ला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन शिवकुमार धुर्वे यांनी प्रसंगवधान राखत काठीच्या साहाय्याने मुलाला तारांपासुन दूर केले. (Electric wire current) घटनेची माहिती मिळताच थानेदा र वैजयंती मंडवधरे या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाल्या. जख्मी मुलाला तातडीने प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यास पुढील उपचा रासाठी मेयो रुग्णालय नागपुर येथे रेफर केले. घटनेची माहिती मिळताच रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी संबंधित अधिकाऱ्यां शी संपर्क साधुन योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

“वेळीच उपाययोजना केली असती तर घटना टळली असती”

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महावितरण विभागावर गंभीर आरोप केले. वेकोलिच्या सततच्या डंपिंगमुळे परिसरात मातीचे ढिगारे वाढल्याने ११ हजा र व्होल्टेजच्या विद्युत तारा धोकादायकरित्या खाली झुकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी जोरदार वाऱ्यामुळे (Electric wire current) विद्युत पोल कोसळले होते. या बाबत वारंवार तक्रारी व पत्रव्यवहार करून ही महावि तरण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. नागरिकांच्या मते “प्रशासनाने वेळेत उपाययोज ना केली असती तर आज एका निष्पाप मुलाचा जीव धोक्यात आला नसता.” या घटनेमुळे परिसरात भीती चे वातावरण निर्माण झाले आहे.

खेळाच्या मैदानाअभावी मुलांचे जीव धोक्यात

कांद्री परिसरात अनेक वर्षांपासुन मुलांसाठी सुरक्षित खेळाचे मैदान नसल्याने मुले धोकादायक स्थळी खेळण्यास प्रवृत्त होत असल्याचा आरोप नाग रिकांनी केला आहे. या संदर्भात १२ फेब्रुवारी २०२६ ला नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देऊन अतिक्रमण हटवुन खेळाचे मैदान, बाजाराची व्यवस्था आणि पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्या  ची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याचा आरोप करण्यात आला. घटनेनंतर नागरिकांनी नगराध्यक्ष सुजित पानतावणे यांच्या नेतृत्वातील नगरपंचायत प्रशासन आणि महा वितरण विभागा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जख्मी मुलाला तातडीने आर्थिक मदत व नुक सान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
             
दरम्यान महावितरण विभागाचे अधिकारी श्रीवास्तव यांनी घटनास्थळी भेट देऊन योग्य कार्यवा हीचे आश्वासन दिले. मात्र सामाजिक कार्यकर्ते पवन कुंभलकर, पोलीस पाटील काचन मस्के, निकेश मेश्राम सह संतप्त नागरिकांनी “आश्वास न नको, कायम स्वरूपी उपाय हवा,” अशी ठाम भूमिका घेत प्रशासनाला तातडीने समस्या सोडविण्याची इशारा सह मागणी केली आहे.

संबंधित सामग्री

सोशल मीडिया वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठी नवे नियम? सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले महत्त्वाचे निर्देश

सोशल मीडिया वापरणाऱ्या अल्पवयीन मुलांसाठी नवे नियम? सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले महत्त्वाचे निर्देश

१८ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला कायदेशीर सुरक्षाव्यवस्थेचा विचार करण्यास सांगितले. पालकांची संमती आणि वय पडताळणीचा मुद्दा चर्चेत आहे.

Sep 29, 2026
‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

‘निर्भयानंतर किती बदल झाला?’ दिल्ली-NCRमधील घटनांवर सुप्रीम कोर्टाचा गंभीर सवाल

दिल्ली-NCRमधील लैंगिक अत्याचारांच्या घटनांवर सुप्रीम कोर्टाची सुओ मोटू दखल; सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेवर दिल्ली पोलिसांना सवाल.

Sep 28, 2026
वीज खांबावरील कामासाठी खासगी व्यक्तींना लावल्यास कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

वीज खांबावरील कामासाठी खासगी व्यक्तींना लावल्यास कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

Mahavitaran's strict circular: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत वितरण यंत्रणेच्या कामांबाबत अत्यंत गंभीर परिपत्रक काढले आहे. विद्युत वाहिन्या आणि उपकरणांवर अनधिकृत, खासगी व्यक्तीं..

Sep 27, 2026
हिंगोलीत महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात नागरिक आक्रमक

हिंगोलीत महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात नागरिक आक्रमक

Hingoli Mahavitaran: शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित आणि धोकादायक वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर २२ सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयावर भेट दिली.

Sep 23, 2026
मुंबईच्या जोगेश्वरीत गणेश विसर्जनावेळी विजेचा धक्का; १९ वर्षीय रोहित राठोडचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईच्या जोगेश्वरीत गणेश विसर्जनावेळी विजेचा धक्का; १९ वर्षीय रोहित राठोडचा दुर्दैवी मृत्यू

कृत्रिम तलावातील पाणी किंवा यंत्रणेत विद्युतप्रवाह उतरल्याची प्राथमिक माहिती; मेघवाडी पोलिसांकडून ADR दाखल करून तपास सुरू

Sep 20, 2026