कन्हान स्मशान घाट

कन्हान नदीकाठावर प्रस्तावित स्मशान घाटाला तीव्र विरोध

Kanhan Cremation Ghat: मौजा कन्हान-पिपरी येथील सर्वे क्रं. २७३, नदीकाठच्या जागेवर प्रस्तावित स्मशान घाट बांधकामा च्या ठरावाला पंचशील नगर सत्रापुर येथील नागरिकां  नी तीव्र विरोध दर्शविला आहे.

कन्हान नदीकाठावर प्रस्तावित स्मशान घाटाला तीव्र विरोध

Kanhan Cremation Ghat

 

प्रभाग क्रं.१० नागरिकांच्या आरोग्य, वाहतुक व धार्मिक भावनांचा प्रश्न
प्रस्तावित जागेचा ठराव रद्द करण्याची मागणी

कन्हान (Kanhan Cremation Ghat) : मौजा कन्हान-पिपरी येथील सर्वे क्रं. २७३, नदीकाठच्या जागेवर प्रस्तावित स्मशान घाट बांधकामा च्या ठरावाला पंचशील नगर सत्रापुर येथील नागरिकां  नी तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात नगरसेवक शक्ती विरसेन पात्रे प्रभाग क्रं. १०, पंचशील नगर, सत्रा पुर कन्हान यांनी कन्हान-पिपरी नगरपरिषदेचे मुख्या धिकारी/नगराध्यक्ष यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून प्रस्तावित ठराव रद्द करण्याची मागणी केली आहे.
             
निवेदनात प्रस्तावित जागा नदीकाठच्या परि सरात असुन पावसाळ्यात कन्हान नदीला पूर आल्या स संपुर्ण परिसर जलमय होण्याची शक्यता आहे. त्या मुळे स्मशान घाटासाठी ही जागा सुरक्षित नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रेतदहनातुन निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिक, विशेषतः लहान मुले व वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
       
मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा प्रश्न- पंचशील नगर सत्रापुर परिसरात ये-जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने त्याच ठिकाणी अंत्ययात्रा काढल्यास वाहतु कीची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. महिला, बालके तसेच व्यावसायिकांवरही त्याचा मान सिक व सामाजिक परिणाम होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. रेल्वे बोगदा आणि पावसाळयातील धोक्याचा मुद्दा- प्रस्तावित स्मशान घाटाच्या जवळील रेल्वे बोग दा हा तीव्र उतार-चढावाचा असुन पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे अंत्य यात्रा किंवा वाहतुकी दरम्यान अपघाताचा धोका निर्मा ण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  
       
कोलकाता-हावडा रेल्वे गेटचाही प्रश्न- वस्तीला जोडणारे मुख्य कोलकाता-हावडा रेल्वे गेट रेल्वे वाहतु कीमुळे वारंवार बंद राहते. एकदा बंद झाल्यानंतर तो सुमारे १५ ते २० मिनिटे उघडत नसल्याने अशा परि स्थितीत अंत्ययात्रा रेल्वे गेटवर अडकण्याची शक्यता असुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शक तो, असा आक्षेप घेण्यात आला आहे. प्राचीन काली माता मंदिराच्या पावित्र्याचा मुद्दा - प्रस्तावित जागेच्या अगदी जवळ ऐतिहासिक व प्राचीन काली माता मंदिर असुन येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. स्मशान घाट झा ल्यास मंदिर परिसराच्या पावित्र्यावर परिणाम होण्या ची शक्यता आहे.  

नदीकाठच्या भागात आरोग्याचा धोका- सर्वे क्रं. २७३ ही जागा कन्हान नदीच्या काठावरील खोल गट भागात असल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्या स संपुर्ण परिसर जलमय होऊ शकतो. तसेच ही जागा निवासी वस्तीजवळ असल्याने धूर व प्रदुषणामुळे नाग रिकांच्या, विशेषतः लहान मुले व वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

दलित वस्तीतील नागरिकांच्या भावना विचा रात घेण्याची मागणी- पंचशील नगर ही शासन मान्य घोषित दलित वस्ती असुन येथील बहुतांश नागरिक आर्थिक दृष्ट्या मागास असल्याने वस्तीच्या अगदी तोंडावर तसेच घरातुन थेट दिसेल अशा अंतरावर स्मशान भूमी झाल्यास नागरिकांमध्ये भीती, नकारात्म कता व असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते, असा आक्षेप घेण्यात आला आहे. 

ठराव तातडीने रद्द करण्याची मागणी- पंचशील नगर सत्रापुर परिसरातील ५ हजार नागरिकांचे आरो ग्य, वाहतुक व्यवस्था,रेल्वे गेटची समस्या तसेच धार्मि क भावनांचा विचार करून सर्वे क्रं. २७३ वरील प्रस्ता वित स्मशान घाटाचा ठराव तातडीने रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या ऐवजी वस्तीपासुन सुरक्षित अंतरावर पर्यायी जागेचा विचार करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. नागरि कांच्या मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार न के ल्यास लोकशाही व कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातुन देण्यात आला आहे. नगरसेवक शक्ती पात्रे यांचे नेतुत्वात शिष्टमंडळात समीर मसराम, अमर पात्रे, बादल लोंढे, अजय गायक वाड़, युवराज गायकवाड, बंटी पात्रे, मुकेश गायकवाड, किरण लोंढे, कमलेश पात्रे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.