कंकरवाडी गोठा आग

कंकरवाडी भागात लागोपाठ दुसऱ्या दिवशीही गोठ्याला आग

Kankarwadi Cowshed fire: चिंचाबंभर शिवारातील कंकरवाडी येथील रामेश्वर आश्रुजी जायभाये या शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून पाच लाख रुपयाचे नुकसानीची घटना घडली

कंकरवाडी भागात लागोपाठ दुसऱ्या दिवशीही गोठ्याला आग

Kankarwadi Cowshed fire

रिसोड (Kankarwadi Cowshed fire) : रिसोड तालुक्यातील कंकरवाडी भागात लागोपाठ दुसऱ्या दिवशीही गोठ्याला आग लागण्याच्या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे. दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता च्या दरम्यान चिंचाबंभर शिवारातील कंकरवाडी येथील रामेश्वर आश्रुजी जायभाये या शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून पाच लाख रुपयाचे नुकसानीची घटना घडली असताना लगेच दुसऱ्या दिवशी 3 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजता कंकरवाडी रिसोड मार्गावरील गोरखनाथ जवळ असलेल्या शेख मोईन शेख याकुब राहणार कंकरवाडी या शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून दोन लाख रुपये नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यात मात्र काही नागरिकांच्या सतर्कतेने तीन जनावरांना वाचण्यात यश आले आहे.

आग लागल्याचे कारण अद्याप कळू शकले नसून तलाठी प्रयाग गरकळ यांनी सदर घटनेचा पंचनामा करून अहवाल शासन दरबारी पाठवलेला असून सदर शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत माहिती अशी की शेख याकुब हे दैनंदिन प्रमाणे आपले काम आटोपून आपली जनावरे गोठ्यात बांधून ज्यामध्ये एक गाय (Kankarwadi Cowshed fire) आणि दोन गोऱ्हे त्यांना चारापाणी करत आपल्या घरी गेले रात्री दोन वाजता सदर गोठ्याला आग लागली ही बाब धार्मिक कार्यक्रम आटोपून आपल्या गावी कंकरवाडी ला परत जात असलेल्या कंकरवाडी येथील काही नागरिकांच्या निदर्शनात आली.त्यांनी लगेच गोठ्याकडे धाव घेत गाय व दोन्ही गोऱ्यांना सोडून टाकले.

तत्पूर्वी मात्र सदर जनावरांना किरकोळ भाजले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वेळीच तत्परता दाखवत सदर नागरिकांनी तिन्ही जनावरांचे प्राण वाचवले.मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे साधन नसल्याने आग वर नियंत्रण मिळवता आले नाही. बघता बघता गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले व यामध्ये दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. यामध्ये 20 कोंबड्या जळून मरण पावल्या असून स्प्रिंकलर, ड्रीप, पाईप,बैलगाडी खत बैग आदी साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.

टैग्स: Kankarwadi Cowshed fire