पीक कर्ज

करडा सोसायटीचा पीक कर्ज वाटपास प्रारंभ

Crop loan: करडा सोसायटीने 2026-27 खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप प्रारंभ केला. अकोला व वाशिम जिल्ह्यातील 124 सभासदांना 1 कोटी 62 लाख 42 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले.

करडा सोसायटीचा पीक कर्ज वाटपास प्रारंभ

Crop loan

रिसोड (Crop loan) : सेवा सहकारी संस्था मर्या.करडा सोसायटीच्या सन 2026-27 चे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपास प्रारंभ करण्यात आला आहे. अकोला व वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक मा.डॉ धिरजराव देशमुख साहेब यांचे हस्ते आज पीक कर्ज वाटपास सुरवात झाली असून, चालू हंगामात संस्थेच्या 145 सभासदने आपल्या कडील कर्जाचा भरणा केला असुन, सोसायटी चे नियमितची 100%वसुली झाली असून, आज रोजी सोसायटीने 124 सभासदांना 1 कोटी 62 लाख 42 हजार रुपयेचे कर्ज वाटप (Crop loan) आज करण्यात आले.

सदर कार्यक्रमांस अध्यक्ष म्हणून जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक डॉ. धिरजराव देशमुख साहेब हे होते तर प्रमुख उपस्थिती तालुका वरिष्ठ निरीक्षक पि एन जाधव पालक शाखाधिकारी रमाकांत मस्करे संस्था निरीक्षक पि एन देव्हडे जेष्ठ सचिव बी एन मोरे, बी के सरनाईक कार्यालय सचिव डी ए मुंढे व गटसचिव वृंद उपस्थित होते. संस्थेचे सभासद उत्तमराव ना. देशमुख,सुनिल पवार, अजाबराव देशमुख तसेच मोठेगाव सोसायटी अध्यक्ष संजाबराव देशमुख,लिंगा सोसायटी अध्यक्ष भय्यासाहेब देशमुख मान्यवर मंडळी उपस्थित होती.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
तुपकर, सरनाईकांच्या पाठपुराव्याला यश; जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना लेखी निर्देश

तुपकर, सरनाईकांच्या पाठपुराव्याला यश; जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना लेखी निर्देश

Special crop loan camps: कर्जमाफीचा लाभ मिळूनही नवीन पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या प्रश्नाची अखेर जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे- शेतकरी नेते रविकांत तुपकर

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्र दुष्काळ: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कर्जवसुलीला सरकारचा ब्रेक

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जवसुलीवर निर्बंध, 43 तालुक्यांचा समावेश आणि रोजगार हमी योजनेसाठी 6,728 कोटींचा निधी.

Oct 01, 2026