Ketan Agrawal

लोहगड हत्या प्रकरणात ५,०५३ पानांची चार्जशीट; डिलीटेड चॅट्स, Google History अन् ‘माही’ अकाउंटमधून तपासाला नवे पुरावे

लोहगड हत्या प्रकरणात ५,०५३ पानांची चार्जशीट दाखल. सिया, चेतन आणि रितेश आरोपी; डिलीटेड चॅट्स, Google History अन् फेक Instagram अकाउंटचे पुरावे समोर.

लोहगड हत्या प्रकरणात ५,०५३ पानांची चार्जशीट; डिलीटेड चॅट्स, Google History अन् ‘माही’ अकाउंटमधून तपासाला नवे पुरावे

Ketan Agrawal

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे आरोपी; लोहगडावरील रेकीपासून बनावट Instagram अकाउंटपर्यंतचा घटनाक्रम चार्जशीटमध्ये

पुणे : लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल याला ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणाचा तपास पूर्ण करत पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात तब्बल ५,०५३ पानांची चार्जशीट दाखल केली आहे. तपासादरम्यान आरोपी सियाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या खराब केलेल्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीत डिलीट केलेले चॅट्स, CDR, कॉल रेकॉर्डिंग्ज आणि फोटो यांसह अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, २५ मे रोजी सिया आणि चेतन यांनी केतन अग्रवालला संपवण्याचा कट आखला. त्यानंतर ३१ मे रोजी सिया आणि केतन लोहगडावर गेले. यावेळी सियाने परिसराची पाहणी करून कथित हत्येसाठी योग्य ठिकाण निश्चित केल्याचे तपासात नमूद आहे.

बाली दौरा रद्द करण्यामागे पासपोर्टचा कट?

६ जून रोजी केतन आणि सिया बालीला जाणार होते. मात्र, तिथे दोघांना एकत्र राहावे लागणार असल्याने ४ जूनलाच हत्येचा वेगळा प्लॅन आखण्यात आल्याचे चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. कुटुंबीयांनी विरोध केल्यामुळे हा प्लॅन प्रत्यक्षात आला नाही.

यानंतर मुंबई विमानतळाकडे जात असताना गाडी एका फूड मॉलजवळ थांबली. त्यावेळी सियाने केतनचा पासपोर्ट घेतला आणि तो कचऱ्याच्या डब्यात टाकल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे बालीचा दौरा रद्द झाल्याचे पोलिसांच्या तपासात नमूद आहे.

१४ जूनचा प्रयत्न फसला; १८ जूनला ‘माही’च्या माध्यमातून सापळा

१९ जून रोजी सियाचा वाढदिवस असल्याने महाबळेश्वरमधील एका रिसॉर्टचे बुकिंग करण्यात आले होते. त्याआधी १४ जून रोजी लोहगडावर केतनच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो प्रत्यक्षात पूर्ण झाला नाही.

यानंतर १९ जूनचा महाबळेश्वरचा कार्यक्रम टाळण्यासाठी १८ जून रोजी पुन्हा हत्येचा कट आखण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. केतनला लोहगडावर आणण्यासाठी सिया आणि चेतन यांनी ‘माही’ नावाचे बनावट Instagram अकाउंट तयार केले. या अकाउंटवरून सियाची मैत्रीण असल्याचे भासवत १९ जूनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १८ जूनलाच सियाला लोहगडावर नेऊन सरप्राईज देण्याचा संदेश केतनला पाठवण्यात आला. या संदेशावर विश्वास ठेवून केतन स्वतः सियाला घेऊन लोहगडावर गेल्याचे तपासात समोर आले.

हत्या केल्यानंतर फोन लोकेशन लपवण्याचा प्रयत्न

१८ जून रोजी कथित हत्या घडवताना चेतनने आपले लोकेशन पोलिसांच्या तपासात येऊ नये, यासाठी स्वतःचा फोन एका कामगाराकडे ठेवला होता. त्यानंतर दुसरा मोबाईल घेऊन तो बाईकवरून लोहगडाकडे गेल्याचे चार्जशीटमध्ये नमूद आहे.

केतनला लोहगडावरून ढकलल्यानंतर चेतन जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील एका ढाब्यावर थांबला. तेथे त्याने नाश्त्यासाठी मिसळ खाल्ली आणि त्यानंतर पुण्याकडे रवाना झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

सियाच्या डॅमेज मोबाईलमधून डिलीटेड डेटा रिकव्हर

तपासातील महत्त्वाचा धागा सियाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमधून मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सियाने मोबाईल फोडून तो ड्रॉवरमध्ये लपवून ठेवला होता. हा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्यातील डिलीट केलेले चॅट्स, CDR, कॉल रेकॉर्डिंग्ज आणि काही फोटो पोलिसांना रिकव्हर करता आले.

फॉरेन्सिक तपासणीत सियाच्या Google History मधूनही काही महत्त्वाच्या नोंदी समोर आल्या. रात्री ९ वाजता तिने ‘सोनम रघुवंशी’ प्रकरणाशी संबंधित माहिती, रात्री १० वाजता लोहगड, तर रात्री ११ वाजता लोहगडावरील रात्रीच्या वेळच्या ठिकाणांचा मॅपवर शोध घेतल्याचे तपासात आढळले.

याशिवाय २०२५ मध्ये लोहगडावरून २१ वर्षांची एक मुलगी पडल्याची बातमीही तिने वाचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. हत्येसाठी कोणते विष वापरता येईल, तसेच ‘How Not to Be Manipulated’ म्हणजेच पोलिसांच्या तपासापासून कसे वाचता येईल, यासंदर्भातही शोध घेतल्याचे चार्जशीटमध्ये नमूद आहे.

हत्येनंतर दोन ते तीन दिवसांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यासाठी भावनिक पोस्ट तयार करण्याबाबतही सियाने ‘Make it more emotional’ अशा स्वरूपाच्या सूचना देऊन मजकूर तयार करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

खाटूश्याम मंदिरातील फोटोही चार्जशीटमध्ये

पोलिसांना राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरातील एक फोटो देखील मिळाला आहे. या छायाचित्रात सिया आणि चेतन यांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातलेली दिसते.

मात्र, पोलिसांच्या तपासानुसार दोघांनी अधिकृतरीत्या विवाह केल्याचे कोणतेही रजिस्टर किंवा हिंदू विवाह पद्धतीनुसार लग्न झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि केतन हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरत होता, हे दाखवण्यासाठी हा फोटो चार्जशीटचा भाग करण्यात आला आहे.

रितेश हांगे तिसरा आरोपी; कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा पर्यायही तपासात

या प्रकरणात बीडचा रहिवासी रितेश हांगे यालाही तिसरा प्रमुख आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांच्या मते, रितेशला केवळ हत्येची माहिती नव्हती, तर तो कथित कटाचा सह-रचनाकार होता.

हत्येनंतर चेतन पुण्यात आल्यानंतर इंजिनियर्स कॅफे येथे सर्वप्रथम रितेशला भेटल्याचे तपासात समोर आले आहे. केतनला अपंग करण्यासाठी किंवा त्याची कॉन्ट्रॅक्ट किलिंग करण्यासाठी रितेशने बंगळुरूमधील आपल्या एका मित्राशी संपर्क साधला होता. मात्र, त्या मित्राने हा प्रस्ताव नाकारल्याचे पोलिस तपासात नमूद आहे. बंगळुरूमधील या व्यक्तीचा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे.

८० ते ८५ साक्षीदारांची पडताळणी

पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात ८० ते ८५ साक्षीदारांची क्रॉस-व्हेरिफिकेशन केली आहे. त्यापैकी तीन साक्षीदार महत्त्वाचे असल्याचे तपासात नमूद करण्यात आले असून, त्यांचे जबाब कलम १६४ CrPC अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहेत.

या तिन्ही साक्षीदारांनी आरोपींना कथित गुन्ह्याच्या वेळी किंवा संबंधित घटनाक्रमादरम्यान घटनास्थळाच्या परिसरात पाहिल्याचे पोलिसांनी चार्जशीटमध्ये नमूद केले आहे.

सध्या चेतन चौधरी, सिया गोयल आणि रितेश हांगे यांच्याविरोधात ५,०५३ पानांची चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया आता न्यायालयीन सुनावणीच्या माध्यमातून होणार आहे.

संबंधित सामग्री

 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चाची तयारी; राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा, संजय राऊतांचा दावा

राज-उद्धव ठाकरेंच्या मुंबई मोर्चाची तयारी, विरोधी पक्षांचा पाठिंबा आणि पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांच्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण.

Oct 03, 2026
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास वेगाने; मीनाक्षी शिंदे-राजेंद्र शिंदेंचीही चौकशी होणार?

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तीन आरोपी अटकेत. निखिल यादव-नितेश पवारांची चौकशी सुरू असून मीनाक्षी शिंदे यांच्या चौकशीचीही शक्यता.

Oct 03, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; 9 विशेष पथके, 100 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; 9 विशेष पथके, 100 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी

ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून तिघांना अटक झाली आहे. CCTV, तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू आहे.

Oct 03, 2026