खडकपूर्णा प्रकल्प

खडकपूर्णा प्रकल्पात अंचरवाडी ल.पा तलाव १ क्र. व मिसळवाडी लघुतलावांचा समावेश करावा: शंतनू बोन्द्रे

Khadakpurna Project: खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन योजना (टप्पा क्र. ३) अंतर्गत लाभक्षेत्रामध्ये अंचरवाडी लघु पाटबंधारे तलाव क्रमांक १, अंचरवाडी लघु पाटबंधारे तलाव क्रमांक २ आणि मिसळवाडी लघु पाटबंधारे

खडकपूर्णा प्रकल्पात अंचरवाडी ल.पा तलाव १ क्र. व मिसळवाडी लघुतलावांचा समावेश करावा: शंतनू बोन्द्रे

Khadakpurna Project

चिखली (Khadakpurna Project) : खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन योजना (टप्पा क्र. ३) अंतर्गत लाभक्षेत्रामध्ये अंचरवाडी लघु पाटबंधारे तलाव क्रमांक १, अंचरवाडी लघु पाटबंधारे तलाव क्रमांक २ आणि मिसळवाडी लघु पाटबंधारे तलाव यांचा समावेश करून त्यांना खडकपूर्णा प्रकल्पाचा भाग म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु भारत बोंद्रे यांनी पालकमंत्री  ना. मकरंद आबा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित तीनही लघुतलावांची उभारणी सुमारे ४० वर्षांपूर्वी पूर्ण झाली असून त्यानंतर खडकपूर्णा मोठ्या सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. सन २०१४ पासून या प्रकल्पावर सिंचन सुरू झाले, तर २०१७ मध्ये प्रकल्पाचे व्यवस्थापन सिंचन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. मात्र, खडकपूर्णा प्रकल्पाचे लाभक्षेत्र निश्चित करताना या तीन लघुतलावांच्या सिंचन क्षेत्राचा समावेश करण्यात आला नाही.

या (Khadakpurna Project) तिन्ही लघुतलावांवर पाणी वापर संस्था स्थापन झाल्या असल्या तरी कालव्यांची अत्यंत जीर्ण अवस्था असल्यामुळे त्या प्रभावीपणे कार्यरत होऊ शकल्या नाहीत. परिणामी लाभधारक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकल्पाचा पुरेसा लाभ मिळत नसून सिंचनासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खडकपूर्णा प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र २५,८०० हेक्टर असून त्यापैकी सुमारे १४,५०० हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन योजनेअंतर्गत आहे. या योजनेसाठी ३० दलघमी पाणी नियोजित असल्याने संबंधित तीन लघुतलावांचे लाभक्षेत्र डिनोटिफाय करून ते खडकपूर्णा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट केल्यास उपलब्ध पाण्याचा अधिक परिणामकारक वापर होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या तीनही लघुतलावांचे एकूण लाभक्षेत्र १,७९७ हेक्टर असून त्यापैकी केवळ ९५३ हेक्टर क्षेत्रावरच सिंचन होत आहे. हे क्षेत्र खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक ३ मध्ये समाविष्ट केल्यास अतिरिक्त ८४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

या मागणीसंदर्भात संबंधित विभागाकडून तातडीने प्रस्ताव सादर करून आवश्यक प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती शंतनु बोंद्रे यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रतिलिपी आमदार मनोजभाऊ कायंदे (सिंदखेड राजा) आणि आमदार श्वेताताई महाले पाटील (चिखली) यांनाही देण्यात आल्या आहेत.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीला अनुसरून चिखली मतदारसंघातील जलसंपदा प्रश्नांना गती..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीला अनुसरून चिखली मतदारसंघातील जलसंपदा प्रश्नांना गती..

MLA Shweta Mahale Patil: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील जलसंपदा, सिंचन व पूर संरक्षणाच्या कामांना गती देण्याच्या धोरणानुसार चिखली विधानसभा मतदारसंघ...

Jul 28, 2026
विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले.. 

विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले.. 

MLA Vijay Wadettiwar: गोसेखुर्द च्या पाण्याचे साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुटका घेतली. शेतकऱ्यांचा आंदोलन थांबवून, दि. १७ जुलै कोळी १० वाजता पाणी सोडले जाते. विजय वडेट्टीवार यांनी अल्टिमेटम

Jul 16, 2026