लातूर शिंदे शिवसेना

शिंदे शिवसेनेने केली दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

Latur Shinde Shiv Sena: यंदा पावसाळ्याचे अर्धे दिवस सरले तरीही पाऊस न झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया असून शासनाने लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवसेना

शिंदे शिवसेनेने केली दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

Latur Shinde Shiv Sena

 

जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पहिल्यांदा गेले राजकीय पक्षाचे लक्ष!

लातूर (Latur Shinde Shiv Sena) : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२५-२६ सालातील थकीत पीकविमा अद्याप मिळाला नाही. यंदा पावसाळ्याचे अर्धे दिवस सरले तरीही पाऊस न झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया असून शासनाने लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी पहिली आणि आग्रही मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे केली आहे. खरिपाची पिके पावसा अभावी सुकत असून याची गंभीर नोंद घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही मागणी केली आहे. अशी मागणी करणारा शिवसेना हा जिल्ह्यात पहिलाच पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे तात्काळ दुष्काळी उपाय योजना न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशाराही शिवसेनेने दिला आहे. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन दाने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती विषयी रीतसर निवेदन दिले. गेल्या वर्षीचा पिक विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. यंदाही तीच परिस्थिती परत उद्भवू नये, असे निवेदनात म्हटले आहे. गतवर्षीचा पिक विमा तात्काळ द्यावा. अनेकवेळा सांगूनही पीकविमा कंपनी कसलीही कार्यवाही करत नाही, याकडे लक्ष द्यावे.

यावर्षी एल्निनो मुळे पाऊस नाही. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या सुद्धा झाल्या नाहीत. पेरणी झालेल्या भागात पावसाअभावी सोयाबीन पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. लातूर, असा, रेणापूर तालुका तसेच इतर तालुक्यात देखील दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप पिके तर जातीलच पुढील रबी हंगाम देखील धोक्यात आहे. शेतकऱ्यांनी पेरणी, खते, फवारणी साठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. तरी गेल्यावर्षीचा आणि  यावर्षी देखील पीकविमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, अशी शेतकऱ्याची मागणी आहे, असे शिवसेनेने निवेदनात म्हटले आहे.  या (Latur Shinde Shiv Sena) शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन दाने, उपजिल्हाप्रमुख गव्हाणे, संगायो सदस्य सतीश पाटील, दशरथ सोळुंके, मलिकप्पा हलकांचे, राम शिंदे, बाळू साखरे, दिनेश पाटील,  शिवसैनिक व शेतकरी सहभागी होते.

पीकविम्याबाबत बैठक बोलावली नाही!
पीकविम्याविषयी ठोस कार्यवाहीसाठी बैठक बोलावण्याची मागणी करूनही आपण अद्याप बैठक बोलावली नाही. जिल्ह्यात ताबडतोब दुष्काळी उपाययोजना कराव्यात, अन्यथा सर्व शेतकरी व शिवसेनेच्यावतीने जिल्हाभरात शिवसेना स्टाईल उग्र आंदोलन करण्यात येईल, उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही शिष्टमंडळाने निवेदना दिला आहे.